भंडाऱ्यात भरतो जुन्या वस्तूंचा बाजार

By admin | Published: May 30, 2015 12:58 AM2015-05-30T00:58:19+5:302015-05-30T00:58:19+5:30

भंडारा : जिल्ह्यात दर रविवारी भरणाऱ्या बाजारात टाकावू वस्तुंची विक्री होते. सर्वच प्रकारच्या भंगार वस्तू मुंबईहून ठोकमध्ये आणून व्यापारी येथे फुटपाथवर विकतात.

Old stores of old filling in stores | भंडाऱ्यात भरतो जुन्या वस्तूंचा बाजार

भंडाऱ्यात भरतो जुन्या वस्तूंचा बाजार

Next

भंडारा : भंडारा : जिल्ह्यात दर रविवारी भरणाऱ्या बाजारात टाकावू वस्तुंची विक्री होते. सर्वच प्रकारच्या भंगार वस्तू मुंबईहून ठोकमध्ये आणून व्यापारी येथे फुटपाथवर विकतात. या व्यवसायात लाखोची उलाढाल होते. ग्राहकांनाही कमी पैशात वस्तू मिळाल्याचा आनंद होतो.
बाहेरुन आलेले विक्रेते मुंबईहून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात. यामध्ये फर्निचर, जर्कीन, खेळणी, इलेक्ट्रिक वस्तू, स्टिलची जुनी भांडी, टेपरेकॉर्डर, सी.डी., फ्रीज, स्टील आलमारी, टायर, सायकलचे सुटे भाग, चप्पल, लोखंड, दरवाजे, खिडक्या, टीन, शटर, बादल्या आदी अनेक वस्तुंची विक्री केली जाते. जुन्या वस्तुंच्या व्यवसायामध्ये व्यावसायिक व बेरोजगार युवक गुंतले आहेत. ट्रकच्या फाटलेल्या ताडपत्र्या, अतिक्रमीत दुकानाचे सुटे भाग, लोखंडी पलंग आदी वस्तुंना या बाजारात मागणी आहे. ्
रविवारच्या बाजारावर परिसरातील किमान मिनीडोर, रिक्षा, आॅटो हमाल आदी लोक अवलंबून आहेत.रविवार हा भंडाऱ्यात बाजाराचा दिवस असल्यामुळे नेमका याचाच फायदा हे विक्रेते घेतात. बसस्थानक चौक, नागपूर नाका, विश्रामगृहासमोरचा परिसरातील फुटपाथवर हा बाजार भरतो. सकाळी ११ वाजता बाजाराला सुरुवात होते. ते सायंकाळी ७ पर्यंत बाजार सुरू असतो. त्यामुळे रविवारी या परिसरातील रहदारी पूर्ण जाम होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Old stores of old filling in stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.