जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:56 PM2019-06-29T22:56:23+5:302019-06-29T22:56:39+5:30
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून २००५ पूर्वी नियुक्ती दिलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनीच पेन्शन मिळावी, या मागणीला घेऊन शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने आक्रमक पावित्रा अवलंबविला. संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत मागण्यांचे निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून २००५ पूर्वी नियुक्ती दिलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनीच पेन्शन मिळावी, या मागणीला घेऊन शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने आक्रमक पावित्रा अवलंबविला. संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत मागण्यांचे निवेदन दिले.
एकीकडे सभागृहात कोणतीही चर्चा न करता आमदार खासदार आपल्या पेन्शन वाढीचे बिल त्वरित पास करतात तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुढाकार घेत नाहीत नवीन पेन्शन योजना पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी असती तर या योजनेला विरोधच झाला नसता. सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आग्रही आहे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जुन्या पेन्शनच्या मागणीसह एक तारखेला नियमित वेतन अदा करणे, वैधकिय प्रतीपूर्ती देयके, भविष्य निर्वाह निधी प्रकरणमे निकाली काढणे, अतिरिक्त शिक्षकांचे जिलास्तरावर समायोजन करणे,समायोजन होईपर्यंत जुन्याच शाळेतून पगार सुरू ठेवणे, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे पगार सातव्या वेतन आयोगानूसार निश्चित करून पेंशन प्रकरणे निकाली काढणे, नगर परिषद शिक्षकांच्या जीपीएफ पावती वेतन पथक कार्यालयामार्फत देणे, अंशत: अनुदानीत शाळा व तुकडीवरील शिक्षकांना वैधकिय प्रतीपूर्ती योजना लागू करणे, कस्तुरबा गांधी विद्यालय चान्ना येथील प्रकरणाची चौकशी करणे, नगरपालीका व महानगर पालीका शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करणे ,संच निर्धारणात शिक्षकेत्तर कर्मचाºयाची पदे मंजूर करणे, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता देवून त्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे या मागण्यांचा समावेश आहे.
शनिवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष व्ही. यू. डायगव्हाणे यांचे नेतृत्वात नागपूर येथील संविधान चौकात तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दुपारी २ ते ५ वाजताच्या दरम्यान धरणे देऊन शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी केले. जिÞलाध्यक्ष सुधाकर देशमुख, टेकचंद मारबते, भाऊराव वंजारी, अनंत जायभाये, विलास खोब्रागडे, समशाद सय्यद, पुरूषोत्तम लांजेवार आदींनी सभेला मार्गदर्शन केले. संघटनेचे जिला कार्याध्यक्ष चंद्रशेखर राहांगडाले यांनी संचालन तर आभार शाम घावड यांनी मानले. यावेळी रंजनकुमार डे, मेघराज अंबादे, भीष्मा टेंभुर्ने, धीरज बांते, पंजाब राठोड, कांता कामथे, छाया वैध, अर्चणा भोयर, दिनकर ढेंगे, उमेश पडोले, विजय देवगीरीकर, अनिल कापटे, नाम घावल, मोरेश्वर वझाडे, प्राथमिकचे दारासींग चव्हाण, धनवीर कानेकर, प्रभाकर मेश्राम, अरविन्द नानोटी, दिपिका ढेंगे, कुणाल जाधव तसेच खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनाला पाठिंबा
पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याबरोबरच सर्व कर्मचारी ३० ते ३५ वर्षे शासनाला सेवा देतात व्यवसाय कर, इन्कम टॅक्स नियमित देण्यात कसुर करीत नाही शासनाच्या योजना राबवितात निवडणूक, जनगणना, यासारखे अनेक कामे तनावपुर्ण वातावरणात देखील पार पाडतात त्यामुळेच त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी स्वत: व कुटूंबासाठी पेन्शनची गरज असते. या आंदोलनाला या धरणे आंदोलनास खाजगी प्राथ. शिक्षिक संघ व कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ भंडारा तसेच अनेक सामाजिक शैक्षणिक संघटनांनी पांठीबा दिला.
जुनी पेंशन योजना पुन्हा लागू करावील या मागणीला घेऊन वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सदर पेंशन योजनेवर आमचा हक्क असताना तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, या भूमिकेवर संघटना लढा देत आहेत. यावर शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.