एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागतो दीड तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:46 PM2018-03-09T22:46:29+5:302018-03-09T22:46:29+5:30

आठवडाभरापासून भंडारा येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाच्या डागडूजीचे काम सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन आवागमन करणाऱ्या करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांना एक ते दिड तास कारधा ते भंडारा हे एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागत आहे.

One-and-a-half hours to cover a distance of one kilometer | एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागतो दीड तास

एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागतो दीड तास

Next
ठळक मुद्देवैनगंगा नदीवरील पुलाची डागडूजी : राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

देवानंद नंदेश्वर / अशोक पारधी ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : आठवडाभरापासून भंडारा येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाच्या डागडूजीचे काम सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन आवागमन करणाऱ्या करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांना एक ते दिड तास कारधा ते भंडारा हे एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागत आहे. भंडारा येथे विविध कामांसाठी जाणाºया प्रवाशांना त्यांच्या कामापासून वंचित राहावे लागले आहे.
चौपदरीकरणापासून वंचीत असलेल्या शिंगोरी ते मुजबीपर्यतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडूजीसह डांबरीकरणाचे काम मागील महिनाभरापासून सुरु आहे. या कामामुळे काही प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत होती. मात्र आठवडाभरापासून भंडारा येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाच्या डागडूजीच्या कामामुळे वाहनांच्या दुतर्फा पाच किलोमिटरपर्यंत रांगा लागत आहे. गतंव्य स्थान गाठण्यासाठी वाहनचालकांना कमालिची कसरत करावी लागत आहे. शुक्रवारला पुलावरील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पुलावरुन जाण्यासाठी वाहनचालकांमध्ये स्पर्धा दिसून आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा - महाविद्यालयाला दांडी मारावी लागली. बसने प्रवास करणाºया रुग्णांना वैद्यकीय उपचाराशिवाय घरी परतावे लागले. हाल सहन करणारे प्रवासी हेच का ते अच्छे दिन, अशा चर्चा एस. टी. बसमध्ये करतांना दिसत होते. कार व दुचाकी वाहन बसला मागे टाकून पुढे काढले जात असतांना बसमधून प्रवास करणारे ओरडून त्यांना शिवीगाळ करीत होते. त्या वाहनाच्या पुढे जाण्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. मुजोरी त्याची शिरजोरी हा प्रकार दिवसभर पाहायला मिळाला.

Web Title: One-and-a-half hours to cover a distance of one kilometer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.