एक कोटी ९० लाखांचे वीजवाहिनी काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:24+5:302021-07-01T04:24:24+5:30

पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूरसह ४८ गावांतील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक कोटी ९० लाख रुपयांची नवीन वीजवाहिनी मंजूर झाली ...

One crore 90 lakh power line work in progress | एक कोटी ९० लाखांचे वीजवाहिनी काम प्रगतीपथावर

एक कोटी ९० लाखांचे वीजवाहिनी काम प्रगतीपथावर

Next

पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूरसह ४८ गावांतील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक कोटी ९० लाख रुपयांची नवीन वीजवाहिनी मंजूर झाली आहे. या ११ किलोमीटर वीज वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. दोन महिन्यांत वीजपुरवठा या वाहिनीवरून सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

पालांदूर परिसर गत वर्षभरापासून खंडित वीज पुरवठ्याचा समाना करीत आहे. जोराचा वारा आला आणि थोडा पाऊस झाला तरी वीज खंडित होत होती. वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. पालांदूर येथे आसगाव येथून वीजपुरवठा केला जातो. २९ किलोमीटरची वीज वाहिनी ४८० खांबांवर चढून दुरुस्ती करायला कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत होते. रात्र अंधारात काढावी लागली होती. ही समस्या पालांदूर येथील शिष्टमंडळाने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना सांगितली. नवीन वीज वाहिनीसाठी मोठा खर्च अपेक्षित होता. कोरोना संकटाने निधीचा वानवा होती. परंतु नाना पटोले यांनी डीपीडीसी अंतर्गत एक कोटी ९० लाख रुपये मंजूर केले. कामाला सुरुवात होऊन काम प्रगतीपथावर आहे. दोन महिन्यांत काम पूर्णत्वाला जाऊन पालांदूरसह ४८ गावांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.

बाॅक्स

वीज वितरण कंपनीचे सहकार्य

पालांदूर ते आसगाव या २९ किलोमीटर वीज वाहिनीचे सर्व इन्सुलेटर बदलण्यात आले. नव्याने आणखी काही सुधारणा करीत ३३ केव्हीची वीज वाहिनी सुरळीत झाली. परंतु अचानक या वाहिनीवर नैसर्गिक, कृत्रिम अडचण उपलब्ध झाल्यास पर्यायी व्यवस्था आवश्यक होती. ती करण्याच्या अनुषंगाने पालांदूरच्या शिष्टमंडळाने नाना पटोले यांना नव्या वीजवाहिनीचा प्रस्ताव दिला. बारव्हा ते सानगडी या वाहिनीवरून दिघोरी येथून पालांदूरसाठी ११ किलोमीटर अंतराच्या नव्या वीजवाहिनीचा पर्याय पुढे आला. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, कार्यकारी अभियंता स्मिता पारखी, उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे, सहाय्यक अभियंता मयंक सिंग, प्रधान तंत्रज्ञ हिरामण बारई यांचे सहकार्य लाभले.

Web Title: One crore 90 lakh power line work in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.