पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना एक कोटीचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:52+5:30

आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर  तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते  सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या.

One crore rupees from OTP fund in five years! | पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना एक कोटीचा गंडा!

पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना एक कोटीचा गंडा!

googlenewsNext

देवानंद नंदेश्वर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मेहनत न करता पैसे कमाविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे,  ओटीपीच्या माध्यमातून बँकेतून पैसे गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यातूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षाकाठी भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत एक कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे.
आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर  तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते  सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये ३५ प्रकरणे,  तर गत दहा महिन्यांत सायबर माध्यमातून फसवणुकीचे गोंदिया जिल्ह्यात  १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते.  अनेकदा फसवणूक करणारा इसम अनोळखी नंबरहून व प्रीपेड सीमकार्ड वापरून बोलायचा. दुसऱ्या वेळी तो नंबर लावल्यास तो नंबर ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’ किंवा ‘स्विच ऑफ’ असा दाखवितो.  आताही तीच बाब घडत आहे. त्यामुळे पैसे एकदा गेले की, ते मिळणे कठीण आहे.

अनोळखी ॲप घेऊ नका
n डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ॲप्लिकेशन्स आली आहेत. हेच ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक ‘सर्व टर्मस् आणि सर्व कंडिशन्स अप्लाय’ करतात. त्यामध्येच ‘ऑटो ओटीपी रीड’ यालासुद्धा परवानगी देऊन टाकतात. अनोळखी ॲप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी, आता स्वतः जागरूक होऊन नागरिकांनीच ‘अनोळखी ॲप नको रे बाबा’ अशी बाब म्हणण्यास सुरुवात केली आहे. फसवणुकीचे गुन्हेही अशाच ॲपमधून डेटा चोरी करून घडत आहेत.

महिन्याकाठी तीन-चार गुन्हे

- भंडारा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी २४ लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.  महिन्याकाठी तीन- चार गुन्हे घडतच असतात.  जास्त रकमेने अनेकांची फसवणूक झाल्याचेही ऐकिवात आहे; परंतु अनेकदा भीतीपोटी नागरिक समोर येत नाहीत. पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांतर्फे केले जाते.
 

Web Title: One crore rupees from OTP fund in five years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.