डॉक्टरांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:22 PM2017-10-02T23:22:43+5:302017-10-02T23:23:02+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा डॉक्टरांच्या न्याय मागण्यांकरिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण २ आॅक्टोबरला पवनी येथील गांधी चौकात करण्यात आले.

One-day metaphorical fasting of doctors | डॉक्टरांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

डॉक्टरांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देआयएमएचे आंदोलन : मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा डॉक्टरांच्या न्याय मागण्यांकरिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण २ आॅक्टोबरला पवनी येथील गांधी चौकात करण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या मागण्यानुसार, वैद्यकीय निष्काळजीपणा आणि कारकुनी त्रुटीेमुळे दाखल होणारे फौजदारी खटले बंद करणे, डॉक्टरांवरील हिंसेद्वारे सार्वत्रिक कठोर कायदा करणे, डॉक्टरंवरील ग्राहक संरक्षक कायदा सीपीए नुकसानभरपाईची रक्कम कमी करणे, उपचार नियमामध्ये व्यावसायिक स्वायत्ता देण्यात यावी, पी. सी., पी.एम. डी. टी. सेंट्रल सीईआय पश्चिम बंगाल मधील सी.ई.ए. कायदे, एम. बी.बी.एस. पदविधारकांना सेवा करण्यासाठी सक्षम करणे, एक औषधी एक कंपनी एक किंमत लागू करणे, सहा आठवड्यात आंतरसमितीची शिफारस लागू करणे, डॉक्टर आणि वैद्यकिय संस्थाची एक खिडकी नोंदणी करणे, नेक्स्टऐवजी एकसारख्या अंतिम एमबीबीएस परिक्षा घेणे, डॉक्टर आणि शिक्षकांसाठी समान काम, समान सेवा, समान वेतन, नीट परिक्षेकरिता नियमात सवलत, प्रत्येक सरकारी आरोग्य समितीत आयएएम सदस्याची नेमणूक करावी, अनुदानित रुग्णालयात इंटर्नशिप यांचा नियमित सेवेत समाविष्ट करणे, जीडीपीच्या ५ टक्के सार्वत्रिक कव्हरेजसाठी अंदाजपत्रक तयार करणे आदी मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पवनी आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, डॉ.अरविंद गभने, डॉ.नंदागवळी, डॉ.विकास मेश्राम, डॉ.निशांत मोहरकर यांनी उपोषणाला समर्थन देऊन सहकार्य केले. यावेळी माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, विकास राऊत, प्रकाश पचारे, विजय रायपुरकर, मनोहर उरकुडकर, शंकर तेलमासरे, मोहन पंचभाई यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.

Web Title: One-day metaphorical fasting of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.