एक लाख हेक्टरमधील धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:00 AM2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:01:11+5:30

भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले.

One lakh hectares of rice crop in danger | एक लाख हेक्टरमधील धानपीक धोक्यात

एक लाख हेक्टरमधील धानपीक धोक्यात

Next
ठळक मुद्देकीडींचा प्रादुर्भाव : शेतकरी संकटात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणतात, प्रादुर्भाव केवळ भंडारा तालुक्यातच

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास एक लक्ष हेक्टर क्षेत्रात गादमाशी, खोडकिडा तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून उपाययोजनेसाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. २० दिवसानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्यात धडाक्याने रोवणीला प्रारंभ झाला. धान पिकाला पोषक असे वातावरण असल्यामुळे धान डौलाने उभे होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कधी ढगाळ वातावरणात तर कधी दमदार पावसाची हजेरी यामुळे डौलाने उभे असलेले धानपीक धोक्यात आले. वातावरण बदलाने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी तर धानपिक नष्ट झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यामध्ये गादमाशी, खोडकिडा व पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्यास जिल्हा कृषी विभाग उदासिन दिसून येत आहेत. केवळ कागदावरच उपाययोजना न ठेवता प्रत्यक्षात शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.

अनुदानावर कीटकनाशक औषधींचे वितरण करा
भंडारा जिल्ह्याला गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी मोठ्या आशेने शेतकºयांनी धान पिकाची लागवड केली. मात्र निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षीही शेतकरी संकटात सापडला आहे. धानपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव आहे. किटकनाशके महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती परवडणारी नाही. शासनाने गरजू शेतकऱ्यांना अनुदानावर किटकनाशक औषधींचे वितरण केल्यास शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो, यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील ३०० हेक्टर क्षेत्र वगळता कोणत्याही तालुक्यात किडींचा प्रादुर्भाव नाही. सध्या स्थितीत १४८ लिटर किटकनाशक औषधी कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. पुन्हा औषधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून लवकरच प्राप्त होणार आहे. किडींवर उपाययोजना करण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करुन मार्गदर्शन करीत आहेत.
- हिंदूराव चव्हाण,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा

Web Title: One lakh hectares of rice crop in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती