महिनाभरात पाच जणांना सर्पदंश, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:41+5:302021-07-31T04:35:41+5:30
मालती यादोराव मुंगमोडे (४०) रा. जांभोरा, अरविंद गुणीलाल बिसने (३९) रा. किसनपूर, बबिता विजय राऊत (३९) रा. मुंढरी, मनराज ...
मालती यादोराव मुंगमोडे (४०) रा. जांभोरा, अरविंद गुणीलाल बिसने (३९) रा. किसनपूर, बबिता विजय राऊत (३९) रा. मुंढरी, मनराज गाढवे (४५) रा. निलज बुज व शोधुराम मसराम (५९) रा. जांभोरा यांचा समावेश आहे. यातील चार जण तंदुरुस्त झाले, परंतु निलज येथील मनराज गाढवे यांचा मृत्यू झाला. करडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोका वन्यजीव अभयारण्य व न्यू नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी आहे. सध्या शेतशिवारात रोवणीचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. करडी येथे पंधरा दिवसांपूर्वी एकाच दिवशी आठ जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला होता. परिणामी, श्वानदंशाच्या घटनांनीसुद्धा जनमानस विचलित झाले. आरोग्य केंद्रात आलेल्या सर्पदंश व श्वानदंश झालेल्या सर्व रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आले. रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. काही प्रसंगी आवश्यकतेनुसार पुढील योग्य उपचारासाठी भंडारा रेफर करण्यात येतात.
निलज बुज येथील प्रकरणात सर्पदंश झालेल्या इसमावर उपचार करण्यात आले. लसही देण्यात आली. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने भंडारा रेफर करण्यात आले होते. करडी आरोग्य केंद्रात सर्पदंश लसीचा कुठेही तुटवडा नाही. औषध भांडारात अद्यापही ५५ सर्पदंश लसीचे डोस उपलब्ध आहेत. तर, श्वानदंश लसीचे ५२ डोस शिल्लक असल्याची माहिती करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.जी. तलमले यांनी दिली.
''परिसरातील ग्रामीण भागासाठी असलेल्या करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात साथरोग औषधांचा पुरेपूर साठा उपलब्ध आहे. आरोग्य केंद्रात सर्पदंश व श्वानदंश लसीचे डोससुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. नागरिकांनी वेळीच दवाखान्यात येऊन उपचार करवून
घेण्याची आवश्यकता आहे.''
- गणेश भुयार, औषध निर्माण अधिकारी प्रा. आर.के. करडी,