एक हजार केंद्रांवर देणार ९५ हजार बालकांना ‘लस’
By admin | Published: January 25, 2017 12:36 AM2017-01-25T00:36:36+5:302017-01-25T00:36:36+5:30
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता पहिल्या टप्प्याची आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केलेली असून ...
पोलिओ लसीकरण मोहीम : २९ रोजी पाहिला टप्पा
भंडारा : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता पहिल्या टप्प्याची आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केलेली असून २९ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात १०२२ पोलिओ केंद्र तयार करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील नियमित लाभार्थी व विटभट्टया, ऊस तोडणी कामगार स्थलांतरीत वस्त्या, भटकी जमात, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणामधील जोखमीच्या भागातील लाभार्थी असे ९५ हजार ८३८ बालकांना या मोहिमेमध्ये लस देण्यात येणार आहे. ही मोहिम राबविण्याकरीता २ हजार ६३ कर्मचारी व अधिकारी विविध भागात कार्यरत राहणार आहेत. बुथवर काम आटोपल्यानंतर शहरी भागात ५ दिवस व ग्रामीण भागात ३ दिवस पी.पी.आय. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य सघटनेने सन १९८८ मध्ये पोलीओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ वषार्खाली सर्व बालकांना पोलीओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
२१ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मुलनाकरीता आपण सर्वजन योगदान देत आहात, आपल्या अथक परिश्रमामुळे भारतामध्ये १३ जानेवारी नंतर आजतागायत एकही पोलिओ रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळेच भारताला पोलीओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मार्च २०१४ मध्ये मिळाले.
पोलीओ निर्मुलनाची यशस्वीता बालकांना विहीत वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी व पल्स पोलिओ लसीकरण या ३ आधारस्तंभावर अवलंबून आहे. वरील तिनही कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे पोलीओ टाईप-२ जिवाणू १९९९ मध्ये पूर्ण पणे हद्दपार केले आहे. सन २०१० या वर्षात मालेगाव या शहरात ४ व बीड जिल्ह्यात १ असे ५ रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले होते.
पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. पोलिओ निर्मूलन मोहीमेतील हे सर्वात महत्वाची कृती आहे. पल्स पोलिओ माहिमेचा पहिला टप्प्यामध्ये बालकांना लस देऊन १०० टक्के मोहीम यशस्वी करावी. एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपल्याकडे येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)