माकडे हाकलण्यासाठी गेलेल्या इसमाचा शेतात पडून मृत्यू
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 7, 2023 16:34 IST2023-09-07T16:34:06+5:302023-09-07T16:34:31+5:30
पोलिस स्टेशन अड्याळ येथे गुन्ह्याची नोंद करून तपास पोलिस करीत आहे.

माकडे हाकलण्यासाठी गेलेल्या इसमाचा शेतात पडून मृत्यू
गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, कोंढा-कोसरा : शेतातील माकडे हाकलण्यासाठी सायंकाळी ६ वाजता दरम्यान शेताकडे गेलेल्या व्यक्तीचा शेतामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील अंबाडी येथे घडली. देवराम सावजी धोटे (५०) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
देवरामचे राहत्या घराजवळ शेत होते. शेतात माकडे आल्याची माहिती त्याला मिळाल्याने त्यांना हाकलण्यासाठी तसेच घरातील जनावरांसाठी गवत कापण्यासाठी ते शेताकडे गेले, पण परत आला नाही. रात्र झाल्यावर घरच्या लोकांनी शोध घेतला असता, नरेश कृष्णा काटेखाये यांच्या शेतात देवराम धानामध्ये मृतावस्थेत उबडा पडून होता. पोलिस स्टेशन अड्याळ येथे कलम १७४ अन्वये गुन्ह्याची नोंद करून तपास पोलिस उपनिरीक्षक हेमराज सोरते करीत आहे.