एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:41+5:302021-05-17T04:33:41+5:30
बॉक्स गृहिणी काय म्हणतात गॅस सिलिंडरचे दर, खाद्यतेलाच्या किमती तसेच पेट्रोल-डिझेल प्रचंड महागल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. किराणा ...
बॉक्स
गृहिणी काय म्हणतात
गॅस सिलिंडरचे दर, खाद्यतेलाच्या किमती तसेच पेट्रोल-डिझेल प्रचंड महागल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. किराणा वस्तूंचे दरही प्रचंड वाढले असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांनी जगावे तरी कसे असा प्रश्न पडत आहे.
अनिता गिरेपुंजे, गृहिणी, खरबी नाका
कोट
एकीकडे सर्वसामान्य रोजगारासाठी वणवण फिरत आहेत, तरीही रोजगार मिळत नाही. तर दुसरीकडे प्रचंड महागाईने घर कसे चालवावे असा प्रश्न विशेषता महिलांना पडत आहे. सरकारने यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
वंदना वैद्य, गृहिणी, खरबी नाका
कोट
डिझेलची दरवाढ तसेच मालाचे असणारे शॉर्टेज यामुळे अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. त्यातच संचारबंदीचा परिणामही दिसून येत आहे. नागपूरवरुन येणारा मालही अनेकदा वेळेत आणि पुरेसा येत नाही.
राजेंद्र खेडीकर,
किराणा व्यावसायिक, भंडारा