विनयभंगप्रकरणी एक वर्षाची शिक्षा
By Admin | Published: May 6, 2016 12:30 AM2016-05-06T00:30:31+5:302016-05-06T00:30:31+5:30
अल्पवयीन मुलीशी छेडछाड प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पाचशे रूपयांचा दंडही : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
भंडारा : अल्पवयीन मुलीशी छेडछाड प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मोहाडी तालुक्यातील रोहना येथील रहिवाशी १५ वर्षीय मुलीशी आरोपी तेजराम माणिक भोयर (२०) याने छेडछाड केली होती. ३१ मे २०१४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ही मुलगी टाकीतून पाणी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी तेजरामने मागून तिला ओढून मोठे वडिलांच्या सुनसान घरी घेऊन गेला. तिथून त्याच्या तावडीतून सुटण्याचा तिने प्रयत्न केला. त्यानंतर तिची त्याच्याशी झटापट झाली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिथून पळताना नात्यातील बहिण दिसताच तिला बिलगून मोठ्याने रडू लागली. या घटनेची माहिती तिने आईवडिलांना दिली. त्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी भादंवि ३५४ कलमान्वये व बालकांचे यौन शोषण कायद्याच्या कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते.
हे प्रकरण विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या न्यायालयात चालला. यात सरकारी पक्षाने पाच साक्षीदारांचे बयान घेतले. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी दोषी ठरवित दंड न भरल्यास आरोपीला १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. फिर्यादीकडून जिल्हा न्यायालयाचे साहायक सरकारी वकील अॅड. राजकुमार वाडीभस्मे यांनी युक्तीवाद केला. (जिल्हा प्रतिनिधी)