कांदा शेती झाली तोट्याची
By admin | Published: April 8, 2016 12:38 AM2016-04-08T00:38:48+5:302016-04-08T00:38:48+5:30
भारतात कांदा म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला होता. सरकारची उलथा पालथ एकट्या कांदा उत्पादने केली होती. असा कांदा यावर्षी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरत आहे.
कांदा साठवणुकीसााठी गोदामाचा अभाव : विकायचे कसे
आसगाव : भारतात कांदा म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला होता. सरकारची उलथा पालथ एकट्या कांदा उत्पादने केली होती. असा कांदा यावर्षी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरत आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता बेजार झाला असताना मात्र कांद्याचे उत्पादन अपेक्षेनुरूप झाले. मात्र त्याच्या दरात बाजारभावात अध्यापेक्षा जास्त घट आल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन मुल्यात बरीच घट आल्याने कांदा पिकाची शेती तोट्याची ठरत आहे. पवनी तालुक्यात कांदा उत्पादन भरघोष होत असतानाही कांदा साठवणूक व त्यांच्या विक्रीबाबत कोणतीही व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना हा माल निघताक्षणी विकणे आवश्यक असल्याचे निदर्शनास येत आहे.
भुतकाळात कांदा हा राजकीय विषय ठरला होता. तेव्हा कांद्याने राजकीय लोकांच्या डोळ्यात अश्रु आणले होते. तोच कांदा आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आणत आहे. कारण प्रत्येक घरात कांद्याशिवाय जमत नाही.(वार्ताहर)