आॅनलाईन घोटाळा, आंदोलनाने गाजले वर्ष

By admin | Published: December 29, 2015 02:43 AM2015-12-29T02:43:33+5:302015-12-29T02:43:33+5:30

साकोली तालुक्यात यावर्षी एकाहून अनेक घटना घडलेल्या आहेत. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत इंग्रजकालीन तहसिल

Online scam, agitation by the year | आॅनलाईन घोटाळा, आंदोलनाने गाजले वर्ष

आॅनलाईन घोटाळा, आंदोलनाने गाजले वर्ष

Next

संजय साठवणे ल्ल साकोली
साकोली तालुक्यात यावर्षी एकाहून अनेक घटना घडलेल्या आहेत. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत इंग्रजकालीन तहसिल इमारतीसाठी दुसरी इमारतीचे बांधकाम या दोन गोष्टी कधीही न विसणाऱ्या असल्या तरी यावर्षी पंचायत समितीच्या पॅनेलने आॅनलाईन घोटाळा केला. जांभळी ते मुंडीपार रस्त्यासाठी आंदोलने झाली. एकंदरीत हे वर्ष नवनवीन उपक्रमानेच गाजले.
पंचायत समितीच्या रोजगार हमी दिनामार्फत तांत्रिक पॅनेल अधिकारी यांनी सहकार्याच्या मदतीने लाखो रूपयाचा भ्रष्ट्राचार केला. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण तांत्रिक पॅनेलची चौकशी झाली. मात्र साकोली तालुक्यात प्रत्यक्षात किती रूपयाचा भ्रष्टाचार झाला याचा निश्चित आकडा अजुनही पुढे आला नाही.
येथील इंग्रजकालीन तहसिल कार्यालयाची इमारत दिवसेंदिवस कमी पडत असल्याने गढकुंभली मार्गावर नवीन इमारत बांधकाम सुरू करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीद्वारे आंदोलन करण्यात आले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या बांधकामाची चौकशी करून काम बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. जांभळी ते मुंडीपार या पाच कि़मी. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली. या रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी सर्वच पक्षांनी निवेदन देऊन कर्तव्य पार पाडले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. खड्डे आजही कायम आहेत.
साकोली उपजिल्हा रुग्णालयात ब्लड आॅन कॉलची सुविधा देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने ही मागणी मंजुर केली तरी अंमलबजावणी झाली नाही. दिवसेंदिवस साकोलीची लोकसंख्या वाढली. त्यामुळे शासनाने साकोली ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत केली तशी घोषणाही केली. निवडक कार्यक्रमही जाहीर झाला. मात्र यावरही स्थगनादेश आणून नगरपरिषदेची मागणी करण्यात आली.
यावर्षी नवे पदाधिकारी व नवे अधिकारी, असाही प्रयोग पाहावयास मिळाली. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर येथील तहसिलदार हंसा मोहने यांचे स्थानांतरण नागपूर येथे करण्यात आले. त्यांच्याठिकाणी शोभाराम मोटघरे आले, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर आले, खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी अशा नव्या अधिकाऱ्यांची तालुक्यात एंट्री झाली आहे.

Web Title: Online scam, agitation by the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.