जिल्ह्यात केवळ १०० रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:50+5:302021-02-12T04:33:50+5:30
भंडारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, सध्या जिल्ह्यात केवळ १०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ...
भंडारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, सध्या जिल्ह्यात केवळ १०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. गुरुवारी ७ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर १० जण कोरोनामुक्त झाले.
गुरुवारी ४६५ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी भंडारा, पवनी येथे प्रत्येकी १, लाखनी २ आणि तुमसर तालुक्यात ३ असे सात रुग्ण आढळून आले, तर १० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. मृतांची संख्या ३२६ झाली आहे.
गत सहा दिवसात मोहाडी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. या तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ३३४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १२ हजार ९०८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे.