जिल्ह्यात केवळ १२ कोरोना बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:34 AM2020-12-29T04:34:04+5:302020-12-29T04:34:04+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून सोमवारी तर केवळ १२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून सोमवारी तर केवळ १२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अलीकडच्या काळातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद होय. तर एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. सोमवारी २८३ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात केवळ १२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये भंडारा दोन, तुमसर पाच, लाखनी तीन तर साकोली व मोहाडी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. लाखांदूर आणि पवनी तालुक्यात सोमवारी एकाही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही. सोमवारी तुमसर तालुक्यातील ५७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. आता जिल्ह्यात मृतांची संख्या २९० झाली आहे. एक लाख तीन हजार ४८६ व्यक्तींच्या तपासणीनंतर १२ हजार २२२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होेते. त्यापैकी ११ हजार ५३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या ३९३ व्यक्ती विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४१ टक्के तर मृत्यूदर २.३७ टक्के आहे.