बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:47 AM2018-08-24T00:47:11+5:302018-08-24T00:48:50+5:30

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला.

Only 30 percent water stock in Bavanthadi dam | बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा

बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा

Next
ठळक मुद्देधरण कोरडे राहण्याची भीती : महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांची वाढणार चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला. धरण परिसरात आतापर्यंत ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आगामी काळात धरण कोरडे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
बावनथडी (राजीव सागर) धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांचे संयुक्त धरण आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात धरण परिसरात ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सध्या ३० टक्के पाण्याचा जीवंत साठा आहे. ६३ दलघमी पाणी धरणात उपलब्ध आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात पाऊस न पडल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. १६ आॅगस्टपासून धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. धरणात पाण्याची पातळी ४५० मिमी असून धरणाची पातळी ३४० मिमी इतकी आहे.
धरण परिसरात व मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात पावसाचा जोर नाही. त्यामुळे यावर्षी धरण रिकामे राहण्याची शक्यता अधिक आहे. ७० टक्के धरण आजही रिकामे आहे. यामुळे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. गत आठवड्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी आगामी काळात या प्रकल्पात पुरेशा पाणीसाठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण जाईल.
धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
धरणाच्या सुरक्षेकरिता शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. परंतु बावनथडी धरण परिसरात व अगदी धरणातील पाण्याचा काठापर्यंत पर्यटक सहज प्रवेश करीत आहेत. धरणाच्या सुरक्षेकरिता येथे उपाययोजना केलेली दिसत नाही. मध्यप्रदेशाचा काही भाग नक्षलग्रस्त असल्याने धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य धरणाचे गेट व परिसरावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. मध्यप्रदेश शासनाचे काही कर्मचारी मुख्य गेटजवळ कर्तव्यावर दिसतात. परंतु पर्यटकांची संख्या जास्त राहत असल्याने त्यांचा येथे नाईलाज दिसतो.

Web Title: Only 30 percent water stock in Bavanthadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.