जिल्ह्यात केवळ ३३ बालके शाळाबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 05:00 AM2021-03-27T05:00:00+5:302021-03-26T23:30:51+5:30
कुठलाही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. भंडारा तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आहेत. यात ६ ते १४ वर्षे वयोगटात कधीच शाळेत न गेलेल्या मुली ४ तर २ मुलांचा समावेश आहे.
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनामुळे इतर जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात परतलेल्या किंवा इतर राज्यातून जिल्ह्यात परतलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शाळाबाहा मुलांची शोधमोहीम मार्च महिन्यात राबविण्यात आली. या मोहिमेत ३३ मुले-मुली शाळाबाह्य आढळली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात शिक्षण विभाग प्रयत्नशिल असल्याचे समजते.
कुठलाही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. भंडारा तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आहेत. यात ६ ते १४ वर्षे वयोगटात कधीच शाळेत न गेलेल्या मुली ४ तर २ मुलांचा समावेश आहे. अनितमित उपस्थितीमुळे शाळेत न गेलेले शाळाबाह्य मुले ८ व मुली ५ अशी एकूण १९ बालके शाळावाहा आढळली आहेत.
मुलांची संख्या अधिक
६ ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम मार्च महिन्यात राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३३ बालके शाळाबाह्य आढळली. यात कधीच शाळेत न गेलेली बालके व अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची एकूण संख्या १९ आहे. तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य बालकांची संख्या १४ आहे.
सर्वाधिक शाळाबाह्य मुले भंडारा तालुक्यात
विशेष बाल विकास योजनेचा लाभ घेत १८ वर्षे वयोगटातील शाळाबाहा शोधमोहीम रावविण्याचे ठरविले आहे. सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी भंडारा तालुक्यात आहे. कोविडमुळे शाळेत न गेलेल्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थीची संख्या ६३ हजार ११४ इतकी आहे. कोविडनंतर पाल्यांना नियमित-पणे शाळेत पाठवित असलेल्या पालकांची संख्या १ लक्ष १९ हजार ४०४ आहे. कोविडमुळे इयत्ता ९ वी ते १२ वीचे १३ हजार ३१७ विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. जिल्ह्यात ३ ते ४ वयोगटातील दोन लक्ष ४४ हजार ४३२ बालके आहेत.
दहा दिवस चालली शोधमोहीम
शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभागातील यंत्रणा कामाला लागली होती. १० दिवस सतत दालेल्या सर्वेक्षणात शिक्षक व अन्य बरेचसे कर्मचारी शोधमोहीम राबवीत होते. यात उच्च माध्यमिक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस यांचेही सहकार्य मिळाले.
शाळा बंद न ठेवता विद्याथ्यांचे अध्ययन अध्यापन प्रभावित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. कुटुंबाची शाळाबाह्य शोधमोहीम करीत असताना शिक्षकांनी व अन्य कर्मचारी यांनी एकत्रितपणे सर्वेक्षण केले आहेत. दैनिक आढावा कळविण्यात आला आहे.
- मनोहर बारस्कर,
शिक्षणाधिकारी, (प्राथ.) जिल्हा परिषद भंडारा