जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 05:00 AM2021-09-01T05:00:00+5:302021-09-01T05:00:53+5:30

भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती.

Only 60% of the annual average rainfall in the district | जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी दमदार कोसळणाऱ्या पावसाने यंदा भंडारा जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून केवळ रिमझिम श्रावण सरी तेवढ्या बरसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस कोसळला आहे. जोरदार पाऊस बरसत नसल्याने धान पीक धोक्यात येण्याची शक्यता असून प्रकल्पात ही निम्माच जलसंचय झाला आहे. 
भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. शेकडो घरांना ही फटका बसला होता. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. 
गत १५ दिवसांपासून तर केवळ एक दोन दिवसा आड रिमझिम श्रावण सरी बरसत आहे. जिल्ह्यात धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. एकीकडे पावसाची दडी आणि दुसरीकडे वातावरणात प्रचंड उकाडा यामुळे धान पीक सुकण्याची स्थिती आहे. अनेक बांध्यांमध्ये पाणी आटले असून शेतकरी सिंचनासाठी धडपड करीत असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नाही. 
भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६८२ मिमी, मोहाडी १००५.२ मिमी, तुमसर ७२२.७ मिमी, पवनी ७१६.१ मिमी, साकोली ८१३.५ मिमी, लाखांदूर ७४३.६ मिमी, लाखनी ८७७.० मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ७९४.३ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होते. परंतु श्रावणसरी काही काळ बरसतात आणि निघून जातात. जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.

शेतशिवारात घुमतो इंजिनचा आवाज 
- पावसाने दडी मारल्याने धान पीक जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता डिझेल पंप लावले आहे. त्यामुळे शेतशिवारात डिझेल इंजिनचा आवाज घुमत आहे. डिझेलचे दर ९७ रुपये प्रति लिटर असल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पाऊस केव्हा बरसतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

Web Title: Only 60% of the annual average rainfall in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस