धान्य साहित्यांचा पुरवठा करा तरच शालेय पोषण आहार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:42 PM2017-11-29T22:42:18+5:302017-11-29T22:43:02+5:30
सध्या शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळच दिले जात आहे. सोबत धान्यादी मालाचा साठा पुरवावा तरच माध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवण्यात येईल.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : सध्या शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळच दिले जात आहे. सोबत धान्यादी मालाचा साठा पुरवावा तरच माध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवण्यात येईल. असे जर करण्यात आले नाही तर १ डिसेंबर पासून माध्यान्ह भोजन योजना बंद करण्याचा निर्णय भंडारा जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदनही देण्यात आले.
शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार देण्यासाठी धान्याची माल पुरवठादारांसोबत अजूनही करारनामा केला गेला नाही. त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांना आपल्या वेतनातून धान्यादी माल खरेदी करावे लागत आहे. ज्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी धान्यादी मालाची खरेदी केली त्यांची बिले मुख्याध्यापक संघानी आवाज उचलला तेव्हा बिले देण्याची कारवाई केली गेली आहे. पंधरा दिवसात खरेदी केलेल्या धान्यादी मालाची रक्कम देवू म्हणणाºया प्रशासनाने तीन महिने लावले. तेही संघटनांनी ओरड केली तेव्हा ही एक प्रकारची फसवणूकच केली गेली आहे. आता आपल्या वेतनातून एक दमडीही धान्यादी माल खरेदी करण्यासाठी खर्च करायचा नाही असा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला आहे. शाळांना तांदळाचा तेवढा पुरवठा केला जात आहे. पण, धान्यादी माल दिले जात नाही. शासनानी करारनामा केला नाही त्याची शिक्षा मुख्याध्यापकांनी का सोसायची असा प्रश्न विचारला जात आहे. उधारीवर धान्य कसा खरेदी करायचा. शाळांनी धान्यादी माल खरेदी मुळे शाळांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होवू लागली नाही. याचा मानसिक त्रास शाळा मुख्याध्यापकांना सोसावा लागत आहे. प्रशासनाने तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा पूर्ववत होईपर्यंत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविणे बंद केल्याशिवाय पर्यायच उरला नाही. तांदळासह धान्यादी मालाचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा यांना मुख्याध्यापक संघाने निवेदन सादर केले.धान्यादी मालाचा पुरवठा न झाल्यास १ डिसेंबर पासून भंडारा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविणे बंद करण्याचा इशारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविण्यात आले नाही. या कारणास्तव मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येवू नये असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.एन. टिचकुले, विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी, पी.डी. मुंगमोडे, ए.पी. डोमळे, उमेश पडोळे, सी.एम. यावलकर, डी.एफ. काळे, एच.ए. सिंगनजुडे, प्रदीप रंगारी, अनमोल देशपांडे, राजकुमार बांते, गोपाल बुरडे, व्ही.एच. बांते, राजू भोयर, ए.बी. गोडबोले, एल.जी. राणे, मार्तंड कापगते, कुंदा बोदलकर, एच.के. भुरे, एम.बी. वंजारी, एम.एम. किटे, आर.व्ही. भेंडारकर, एम.एम. मेश्राम, एन.डी. बिल्लोरे, एस.ए. कुकडे, व्ही.डी. नंदनवार आदी उपस्थित होते.