सोंड्याटोला उपसा सिंचनचे केवळ चार पंप सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 09:56 PM2018-07-28T21:56:28+5:302018-07-28T21:56:56+5:30

Only four pump pumps started on Sonditola irrigation | सोंड्याटोला उपसा सिंचनचे केवळ चार पंप सुरु

सोंड्याटोला उपसा सिंचनचे केवळ चार पंप सुरु

Next
ठळक मुद्देनदी कोरडी पडणार : चांदपूर जलाशयात २५ टक्के जलसाठा
<p>मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिहोरा परिसरातील शेतीला वरदान ठरलेला सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पातून मागील १२ दिवसापासून पाणी उपसा सुरु आहे. येथे केवळ चार पंप सुरु असून दोन पंप पाण्याअभावी बंद आहेत. पाणी उपसा उशिरा सुरु केल्याने चांदपूर तलाव पूर्ण भरण्याची शक्यता कमी झाली आहे. सध्या चांदपूर तलावात केवळ २५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बावनथडी नदी कोरडी पडणे सुरु झाल्याने चांदपूर तलावाच्या जलसाठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सिहोरा परिसरातील सोंड्या टोला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील सुमारे ४५ गावातील शेतीला सिंचनाचा लाभ होतो. भंडारा जिल्ह्यातील क्रमांक दोनचा मोठा तलाव चांदपूर या उपसा योजनेतून भरला जातो. दि.१५ जुलै रोजी सोंड्या टोला उपसा प्रकल्पातून प्रत्यक्ष पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला होता. मागील १३ दिवसांपासून पाण्याचा उपसा सुरु आहे. दि.२८ जुलै रोजी चांदपूर तलावात पाण्याची पातळी केवळ ७०.८० इतकी होती. सध्या चांदपूर तलावात केवळ २५ टक्के जलसाठा आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी नसल्याने सहा पंपापैकी केवळ चार पंप सुरु आहेत. उर्वरीत दोन पंप बंद करण्यात आले आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात बावनथडी नदी दुथडी भरून वाहत होती. तेव्हा पाण्याचा उपसा केला गेला नाही. केवळ तांत्रिक अडचणीमुळे पाण्याचा उपसा केला नाही. त्यानंतर आठ दिवसाने पाण्याची उपसा सुरु करण्यात आला. मागील एका आठवड्यापासून पाऊस बंद आहे. मध्यप्रदेशातही पाऊस बरसला नाही. त्यामुळे बावनथडी नदी कोरडी पडणे सुरु झाले आहे.
सोंड्या टोला गावाजवळ नदी कोरडी पडल्याने रेतीचा उपसा सुरु करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.भविष्यात चांदपूर तलाव रिकामा राहिला तर शेतीला पाणी मिळणार नाही. सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांत चिंता व्याप्त आहे. नदी दुथडी भरून वाहत असताना उपसा सिंचन प्रकल्पातून पाण्याचा उपसा न केल्याप्रकरणी चौकशीची मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, सिहोराचे पं.स. सदस्य अरविंद राऊत व अंबादास कानतोडे यांनी केली आहे. तुमसर तालुक्यात १ जून ते २७ जुलैपर्यंत ५५७.६ मिमी पाऊस पडला. चांदपूर जलाशयात २४ टक्के, बघेडा ६९ टक्के, कुरमुडा ६१, कवलेवाडा १९.५१, पवनारखारी १०.२६, आंबागड २९.६६, परसवाडा १०.६९, डोंगरला १००, कारली ३९.८२ अशी तलावांची स्थिती आहे.

तांत्रिक कारणामुळे पहिल्यांदा नदी वाहताना पाण्याचा उपसा केला जात नाही. दि.१५ जुलै पासून पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला. सध्या चार पंप सुरु आहेत.
-एम.जे.मिरत, शाखा अभियंता चांदपूर प्रकल्प
बावनथडी दुथडी भरून वाहत असताना पाण्याचा उपसा केला नाही. सध्या नदी कोरडी पडली आहे. चांदपूर तलाव भरण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शेतकºयांची चिंता वाढली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.
-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य सिलेगाव क्षेत्र

Web Title: Only four pump pumps started on Sonditola irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.