चांदपूर जलाशयाचे पाणी केवळ सात गावांना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:46+5:30
उन्हाळी धान पिकाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यासाठी गत चार महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आक्रमक झाले आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या पद्धतीने संतप्त झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धान पिकांच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यात येणार असून यात उजवा कालव्या अंतर्गत केवळ सात गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. उर्वरित गावांना वगळण्यात आल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. यामुळे थंडीत पाणी प्रश्न पेटणार आहे.
उन्हाळी धान पिकाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यासाठी गत चार महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आक्रमक झाले आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या पद्धतीने संतप्त झाले होते. रोटेशन पध्दतीने उजवा कालवा अंतर्गत गावांचा समावेश यंदा असला तरी चांदपूर जलाशयात अपेक्षेपेक्षा अधिक पाणी शिल्लक असल्याने डावा कालवा अंतर्गत ५०० एकर शेती ओलीताखाली आणण्याचे निर्णयासाठी शेतकºयांनी बैठकीत गोंधळ घातला होता. या बैठकीत पाणी वाटपासंदर्भात निर्णय झाला नाही. ही बैठक रद्द झाल्याचे घोषित करित पुन्हा बैठक आयोजित होणार असल्याचे सांगण्यात आले. सिहोºयात आयोजित होणाºया बैठकीकडे नजरा लागून असतांना पाटबंधारे विभागाने उजवा कालवा अंतर्गत सात गावांना उन्हाळी धान पिकासाठी पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या सात गावांत दावेझरी, रनेरा, नवेगाव, हरदोली, येरली, रुपेरा, डोंगरला या गावांचा समावेश आहे. या गावांचे शेत शिवारात असणारी १२०० एकर शेती ओलीताखाली येणार आहे. येरली वितरिके अंतर्गत येणारी येरली, नवेगाव, डोंगरला गावे टोलवर आहेत. दरम्यान उजवा कालवा अंतर्गत मोहगाव (खदान), सोनेगाव, बोरगाव, धनेगाव, मच्छेरा, सिहोरा, सिलेगाव, मुरली, कर्कापुर गावांना डच्चू देण्यात आला आहे.
डावा कालवा अंतर्गत गावांचा समावेश नाही
उन्हाळी धान पिकांना पाणी वाटपाच्या निर्णयात सात गावांचा समावेश होणार असल्याची अपेक्षा शेतकºयांना होती. परंतु सात गावांना पाणी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रतिक्षेत असणाऱ्या गावांत नाराजीचा सुर आहे. या गावात शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. टेलवर असणाºया येरली वितरिकेला पाणी वाटपाचा निर्णय घेण्यात येवू नये असे लोकप्रतिनिधीची मागणी होती. परंतु ते तोंडघशी पडले आहेत. दरम्यान डावा कालवा अंतर्गत एकाही गावांचा समावेश करण्यात आला नाही.
उन्हाळी धान पिकांसाठी सात गावांना पाणी वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सी. जे. हटवार, शाखा अभियंता, सिहोरा
मोहगाव (खदान) गावाला पाणी वाटपाचे निर्णयातून वगळण्यात आल्याने राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
- उमेश कटरे, सरपंच, मोहगाव