महापुरानंतर शेतात केवळ तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:00 AM2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:09+5:30

वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात.

Only weeds in the field after the flood | महापुरानंतर शेतात केवळ तणस

महापुरानंतर शेतात केवळ तणस

Next
ठळक मुद्देशेतशिवारात स्मशान शांतता : शेतजमीन गेली खरडून, पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून पूर ओसरल्यानंतर आता भात शेतात केवळ वाळलेले तणस शिल्लक दिसत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकºयांत नैराश्य पसरले असून अद्यापही प्रशासनाकडून मदतीचे ठोस आश्वासन मिळाले नाही.
वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात. दोन दिवस जरी पुराचे पाणी शेतात थांबले तरी धानपिकाला फारसा फरक पडत नाही. पीक वाळत नाही. मात्र यावर्षी पूर ओसरल्यानंतर शेतात वाळलेले तणसच दिसत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे कळायला मार्ग नाही.
यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना दोनदा पुराचा फटका बसला. हिरवेगार पीक नेस्तनाबूत झाले. शेतजमिन खरडून गेली. पहिल्या पुरानंतर आठवडाभराच्या अंतराने दुसरा पूर आला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. करडी परिसरात पुरामुळे २२ गावातील तीन हजार हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकरी शेतात जातात तेव्हा समोरील दृष्य पाहून डोळ्यात आसवांचा महापूर आल्याशिवाय राहत नाही. बी - बियाणे आणि मशागतीवर मोठा खर्च केला. परंतु वैनगंगेच्या महापुराने सर्वकाही वाहून नेले. आता शासनाकडून सर्वेक्षण सुरु आहे. परंतु ठोस मदतीचे अद्यापही आश्वासन मिळाले नाही. बँकांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न असून घर संसार चालविण्यासाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी २० हजाराची मदत जाहीर केली. राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत एक रुपयाही मदत शेतकºयांना मिळाली नाही. अनेक शेतकरी देशोधडीला लागले असून या शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा अशी मागणी आहे.

महापुरात जिल्ह्यातील ४३ हजार व्यक्ती बाधित
भंडारा : जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुराचा १४४ गावांना फटका बसला असून त्यात ४३ हजार २८४ व्यक्ती बाधीत झाले आहेत. ४ हजार ७३६ घरे उद्ध्वस्त झाली असून ६७३ घरे पूर्णत: तर ४ हजार ६३ घरे अंशत: बाधीत झाली आहेत. महापुरात ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून एक जण जखमी झाला. ३२० पशूधन पुरात वाहून गेले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका भंडारा तालुक्याला बसला. ४५ गावातील ५२०९ कुटुंब या महापुराच्या तडाख्यात सापडले. १३४१ घरे उद्ध्वस्त झाली असून त्यात ४११ घरे पूर्णत: तर ९३० घरे अंशत: बाधित झाली आहेत. ६९ गोठे महापुराच्या तडाख्यात सापडली असून २६३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

Web Title: Only weeds in the field after the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर