उन्हाळा सुरू झाल्याने वाहनधारकांनो वन्यप्राण्यांसाठी नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:31 AM2021-04-05T04:31:16+5:302021-04-05T04:31:16+5:30

तुमसर : नाकाडोंगरी वन परिक्षेत्रातून तुमसर कटंगी आंतर राज्य महामार्ग जातो. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगेत येतो. महामार्गाच्या ...

With the onset of summer, vehicle owners should follow the rules for wildlife | उन्हाळा सुरू झाल्याने वाहनधारकांनो वन्यप्राण्यांसाठी नियमांचे पालन करा

उन्हाळा सुरू झाल्याने वाहनधारकांनो वन्यप्राण्यांसाठी नियमांचे पालन करा

Next

तुमसर : नाकाडोंगरी वन परिक्षेत्रातून तुमसर कटंगी आंतर राज्य महामार्ग जातो. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगेत येतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, अशा सूचना महामार्गावरील रस्त्यावर लावण्यात आल्या आहेत.

नाकाडोंगरी वन परिक्षेत्र हा घनदाट जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलातून तुमसर कटंगी हा अंतर राज्य महामार्ग जातो चिंचोलीपासून तर गोबरवाहीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.

या जंगलात वाघ, रानडुक्कर, सांबर, हरिण, चितळ, कोल्हे, अस्वल, ससे, रानकुत्रे इत्यादी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. चिंचोली ते गोबरवाही या सहा ते सात किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता जंगलातून जातो.

रस्ता ओलांडताना वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात येऊ नये, याकरिता वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्याच्या सूचना नाका डोंगरी वन परिक्षेत्रात रस्त्याच्या शेजारी लावण्यात आले आहेत. वाहनधारकांना येथे वाहने हळू चालवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, तसेच जंगलातून जाताना हॉर्नचा वापर टाळावा, अशा सूचना फलकावर लिहिलेल्या आहेत. याचे नागरिकांनी पालन करण्याची गरज आहे.

वाहनधारकांनी गती रोखण्याची गरज

जिल्ह्यात राष्ट्रीय तसेच राज्य मार्ग गेले आहेत. त्यामुळे अनेकदा पाण्याच्या शोधार्थ निघालेले वन्य प्राणी रस्ता ओलांडत असताना अनेक वाहनधारक हे वेगवान गतीने जात असल्याने यापूर्वी अपघात घडले आहेत. त्यामुळे जंगलालगत तसेच जंगलातून जाणाऱ्या मार्गावरून वाहनधारकांनी आपल्या वाहनाची गती नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत असल्याने काळजी घ्यावी.

Web Title: With the onset of summer, vehicle owners should follow the rules for wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.