उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:25+5:302021-06-21T04:23:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन व संचारबंदीमध्ये मंदिरेही लॉक झाली होती. पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यात ...

Open the door now ... | उघड दार देवा आता...

उघड दार देवा आता...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन व संचारबंदीमध्ये मंदिरेही लॉक झाली होती. पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करून सर्वच काही उघडल्यानंतर सर्वांत शेवटी मंदिरांना उघडण्याची परवानगी शासनाने दिली होती. आताही तीच अवस्था बघायला मिळत असून भाविकगण ‘उघड दार देवा आता... ’ असे म्हणत आहेत.

गत पंधरवड्यापासून दुसरी लाट ओसरत आहे. जिल्हा प्रथम वर्गवारीतही आला आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असून, सर्वच काही पूर्ववत झाले आहे. मात्र, मंदिरे लॉकडाऊन असून, भाविकांना मंदिराबाहेरूनच देवदर्शन घ्यावे लागत आहे. मंदिर बंद असल्याने भाविक येत नसून चढावे व दानही बंद आहे. त्यातल्या त्यात पूजा साहित्यांची विक्री होत नसल्याने पुजारी व दुकानदार अडचणीत आले असून, सर्वच ‘उघड दार देवा आता...’ अशी आर्त हाक देवाला देत आहे. त्यामुळे प्रशासनाला मंदिराचे निर्बंध शिथिल करण्यास किती वेळ लागतो याकडे लक्ष आहे. मंदिर असल्याने भाविकांना आपल्या देवाचे दर्शन घेता येत नसल्याची खंत असतानाच या मंदिरावर उदरनिर्वाह चालविणाऱ्या पुजारी व दुकानदारांना आर्थिक टंचाई भेडसावत आहे.

किती दिवस कळसाचेच दर्शन

शासनाने सर्व काही खुले करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरांनाच सर्वांत शेवटी परवानगी दिली जाते. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून मंदिर बंद आहे. आता पुजारी मुख्य गेट बंद ठेवत असून, तेथे लावण्यात आलेल्या जाळीतूनच देवदर्शन घ्यावे लागत आहे. यावर राज्य शासनाने निर्णय घ्यायला हवा.

- विष्णू शर्मा (भाविक)

शासनाने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालून तरी मंदिर उघडण्यास परवानगी द्यायला हवी. मंदिरात देवदर्शन करूनच पुढे कामाला सुरुवात करण्याची सवय आहे. त्यामुळे आता मंदिर बंद असताना बाहेरूनच जाळीतून देवदर्शन करावे लागते. सर्व काही सुरळीत सुरू झाले असूनही मंदिर बंद आहे.

दुर्गा नागपुरे (भाविक)

आता यंदाही सर्व काही सुरू झाले असून, मंदिो मात्र बंद आहेत. मंदिरावरच आमचा उदरनिर्वाह होत असल्याने शासनाने मंदिरांबाबत आता निर्णय घेण्याची गरज आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर सर्व काही सुरू झाल्यानंतरही सर्वांत शेवटी दिवाळीनंतर मंदिर सुरू करण्याची परवानगी दिली होती.

-पं. अभिषेक पांडे (पुजारी)

शासनाने अन्य व्यापाऱ्यांप्रमाणे आमचाही विचार करावा, अशी मागणी आहे. मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची संख्याही कमी झाली आहे. शिवाय देवाला हार, फूल व प्रसाद चढविता येत नसल्याने आमची विक्रीही कमी झाली आहे. यामुळे आर्थिक चणचण वाढली असून उदरनिर्वाह प्रश्न भेडसावत आहे.

-महेश इंदूरकर

पूजा साहित्य विक्रेता)

मंदिर बंद असल्याने आमचा व्यापार ठप्प पडला आहे. भाविकांची संख्या कमी झाल्याने साहित्य विकत नाही मात्र, खर्च लागूनच आहेत. लॉकडाऊनचा मार सर्वाधिक आम्हाला बसला. यंदाही सर्व काही सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मंदिरे बंद आहेत. याकडे लक्ष दिले पाहिजे.

- मनोज बनकर,

(पूजा साहित्य विक्रेता)

Web Title: Open the door now ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.