उन्हाळी धान केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची फरपट आता थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:01+5:302021-05-22T04:33:01+5:30
बेलगाव येथील उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बेलगाव येथील सरपंच रीना तुमसरे, ...
बेलगाव येथील उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बेलगाव येथील सरपंच रीना तुमसरे, उपसरपंच मनोज वडतकर, मांडवीचे सरपंच सयसराम कांबळे, पुष्कराज माटे, सचिन बोरकर, सुनील मोटघरे, प्रदीप देशमुख, मंगल केवट, श्रीधर डोरले, चत्रुधन केवट, रवि पडोळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक रामकृष्ण गायधने यांनी शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्रावर उन्हाळी धान विक्री सन २०२० २१ साठी शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन करण्याची अंतिम मुदत ३१ मे असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन करावे, असे आवाहन केले. ऑनलाइनमध्ये शेतकऱ्यांना अडचणी आल्यास स्वतः बेलगाव येथील खरेदी केंद्राच्या कार्यालयात आणून द्यावे व आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही तिरुपती बहुउद्देशीय संस्थेचे व्यवस्थापक रामकृष्ण गायधने यांनी केले आहे. बेलगावच्या सरपंच रीना तुमसरे यांनी शेतकर्यांना खासगी व्यापार्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता शेतकऱ्यांनी बेलगाव येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राचे असलेले सहकार्य व शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात केलेली मदत लाख-मोलाची असल्याचे मांडवीचे सरपंच सयसराम कांबळे यांनी सांगितले. संचालन पुष्कराज माटे यांनी केले, तर आभार उपसरपंच मनोज वडतकर यांनी मानले. यावेळी मांडवी, खमारी, बेलगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
बॉक्स
शेतकर्यांनो ३१ मेपूर्वी आपल्या नावाची नोंदणी करावी
भंडारा तालुक्यातील बेलगाव येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने दूर अंतरावर धान विक्रीसाठी होणारी कटकट कायमची थांबली असून, आमचे गाडी भाडे तसेच अन्य व्यापार्यांकडून होणारी लूट या समस्येतून सुटका झाल्याचे यावेळी उपस्थित शेतकर्यांनी सांगितले. संस्थेचे व्यवस्थापक रामकृष्ण गायधने यांनी शेतकऱ्यांना उन्हाळी धान विक्रीसाठी आपला सातबारा ऑनलाइन करण्याची अंतिम मुदत ३१ मे असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन करावे तसेच शेतकऱ्यांना ऑनलाइनमध्ये काही अडचणी आल्यास स्वतः बेलगाव येथील धान केंद्रात सातबारा आणून आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.