अपहारप्रकरणी कारवाई थंडबस्त्यात

By admin | Published: January 6, 2017 12:54 AM2017-01-06T00:54:58+5:302017-01-06T00:54:58+5:30

दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेऊन बनावट दस्ताऐवजांच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखांचा चुना

Operation in the cold storage | अपहारप्रकरणी कारवाई थंडबस्त्यात

अपहारप्रकरणी कारवाई थंडबस्त्यात

Next

प्रकरण संपत्ती गहाण ठेवण्याचे : जवाहरनगर येथील दाम्पत्याचा समावेश
भंडारा : दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेऊन बनावट दस्ताऐवजांच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखांचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी कळमना पोलिसांनी याप्रकरणी बँकेचे वकील आणि मूल्यांककासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यापैकी जवाहरनगर येथील दिवाकर मेश्राम व आशा मेश्राम या दोघांना अटक केली नाही.
ज्या १३ जणाविरूद्ध गुन्हे दाखल केले होते त्यापैकी जवाहरनगर येथील मेश्राम दाम्पत्यासह गणपत महादेव ढोके (आदर्श नगर), राजू माणिकराव चिंचखेडे (श्रीशरण नगर, खामला), विकास रामकृष्ण भुते (म्हाळगी नगर), चंद्रप्रभा मनोहर सोनवणे (भोलेबाबा नगर, पिपला), मुकेश ध्रुव कुमार मेश्राम व हिमानी शालिकराम मेश्राम, सतीश प्रभुदास डोंगरे (भगवान नगर), राकेश प्रसाद उदयराज शाहु व सोनी राकेश प्रसाद शाहु (बेसा मार्ग), इर्गेश नत्थूजी मथलोन, (वाठोडा), समीर मनोहर वानखेडे व हेमराज राजू वानखेडे. (अंबानगर, उमरेड मार्ग), मीना मधुकर वानखेडे., मधुकर महादेव वानखेडे. (हावरापेठ), ए.ए. काशीकर तथा मूल्यांकक मुंडले अशी गुन्हे दाखल केलेल्या इसमांची नावे आहेत. कळमना पारडी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे. आरोपींनी या बँकेत कजार्साठी अर्ज केला होता. नियमानुसार बँकेने वकील आणि मूल्यांककाच्या माध्यमातून दस्ताऐवजांची तपासणी केली. आरोपींनी दुसऱ्यांची संपत्ती स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती संपत्ती बँकेत गहाण ठेवली. त्या संपत्तीचे बोगस दस्तऐवज सुद्धा त्यांनी बँकेत सादर केले. २००८ पासून हा प्रकार सुरू होता. मार्च २०१६ मध्ये बँकेला याबाबत समजले. बँकेने प्रकरणाचा चौकशी केली तेव्हा प्रकार उघडकीस आला. बँकेतून २ कोटी ३१ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केली. यातील काही इसम बँकेची किस्त वेळवर भरत नव्हते. बँकेचे व्यवस्थापक हरीश जरगर यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)

Web Title: Operation in the cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.