सोशल मीडियातही विकासात्मक पत्रकारीतेसाठी संधी
By admin | Published: November 17, 2016 12:39 AM2016-11-17T00:39:30+5:302016-11-17T00:39:30+5:30
सोशल मिडीयामुळे पत्रकारीतेच्या क्षेत्रात दिवसेंदिवस आमुलाग्र बदल होत आहेत. आजघडीला लोकांपर्यंत अल्पावधीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती मिळत आहे.
रवी गीते यांचे प्रतिपादन : पत्रकार संघात राष्ट्रीय पत्रकार दिन
भंडारा : सोशल मिडीयामुळे पत्रकारीतेच्या क्षेत्रात दिवसेंदिवस आमुलाग्र बदल होत आहेत. आजघडीला लोकांपर्यंत अल्पावधीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रिंट मिडीयाचे महत्त्व कमी होण्याची शक्यता वर्तविली जात असताना सोशल मिडीया ही विकासात्मक पत्रकारीतेसाठी संधी असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी केले.
मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, ज्येष्ठ पत्रकार डी.एफ.कोचे, सचिव मिलिंद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटूले मंचावर होते.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविकातून चेतन भैरम यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्त्व सांगून जिल्ह्यातील तरूण पत्रकार विविध प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या पत्रकार क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. भंडारा जिल्ह्याचा नाव गौरवान्वित करीत आहेत. ज्येष्ठ पत्रकार डी.एफ.कोचे म्हणाले, वर्तमान काळातील पत्रकारीता कशी असावी यावर भर दिला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी विद्यमान समस्या व पत्रकारीता या विषयावर मार्गदर्शन केले.
संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद हळवे यांनी केले. कार्यक्रमाला सुरेश फुलसुंगे, सुरेश काटगले, विलास सुदामे, प्रमोद भांडारकर, विजय क्षीरसागर, बाबा बाच्छिल, उमेश जांगडे, सचिन रणदिवे, पृथ्वीराज बन्सोड, अभिजीत घोडमारे, शैलेश रोशनखेडे उपस्थित होते. दरम्यान, माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात चेतन भैरम, राकेश चेटूले, प्रा.बबन मेश्राम, दिपक रोहणकर, बाबा बाच्छिल, दिपेंद्र गोस्वामी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी घनशाम खडसे, सुनिल जांभुळे, बंडू राठोड, सुनिल फुलसुंगे, घनशाम सपाटे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)