निंदकांमुळे सुधारण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:14 PM2019-01-31T22:14:40+5:302019-01-31T22:15:01+5:30
मानव धर्माचा सेवक तत्त्व, नियमाने चालला पाहिजे. प्रार्थना, विनंती व प्रणाम येत नसणारे सेवक आजही आहेत, असे सेवक खरे नाहीत. सेवक कोणाचाही असो शेवटी तो बाबांचाच आहे. निंदकांमुळे सुधारण्याची संधी मिळते. प्रत्येक आत्म्यात भगवान आहे. चांगल्या लोकांचा विचार करुन दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा. वाईट विचार काढा. मनातील मळ स्वच्छ करु शकाल तरच परमात्म्याचे दर्शन होईल, असे प्रतिपादन मानव धर्म प्रसार व प्रसारीका लता बुरडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मानव धर्माचा सेवक तत्त्व, नियमाने चालला पाहिजे. प्रार्थना, विनंती व प्रणाम येत नसणारे सेवक आजही आहेत, असे सेवक खरे नाहीत. सेवक कोणाचाही असो शेवटी तो बाबांचाच आहे. निंदकांमुळे सुधारण्याची संधी मिळते. प्रत्येक आत्म्यात भगवान आहे. चांगल्या लोकांचा विचार करुन दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा. वाईट विचार काढा. मनातील मळ स्वच्छ करु शकाल तरच परमात्म्याचे दर्शन होईल, असे प्रतिपादन मानव धर्म प्रसार व प्रसारीका लता बुरडे यांनी केले.
बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने मंडळाच्या सांस्कृतिक भवनात भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले, उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, कंठीराम पडारे, राजू पिल्लारे, खासदार मधुकर कूकडे, मनोहरभाई अॅकेडमीच्या वर्षा पटेल, गिता बोकडे, राजू कारेमोरे, अक्षय उरकुडे, नरेश ईश्वरकर, के. के. पंचबुध्दे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, रिता हलमारे, नरेंद्र भोंडेकर, सरस्वता माटे, विजय चाचीरे, विलास चौधरी, भजनलाल पधा, गोपाल धार्मिक, भालचंद्र पुसदेकर, रामभाऊ मोहतुरे, रामरतन वैद्य, नाना दमाहे, किशोर चौधरी, मधुकर वैद्य, उदाराम पिकलमुंडे आदींचा व्यासपिठावर उपस्थिती होती.
जगाला जिंकण्याची शक्ती प्रेमात आहे. या शक्तीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा असे इंजि. विजय चाचीरे यांनी सांगितले. के. के. पंचबुध्दे म्हणाले, बाबानी, महिलांना जीवन जगण्याचे सन्मान मिळवून दिले. बाबांनी, महिलांना जीवन जगण्याचे सन्मान मिळवून दिले. व्यसनमुक्तीचे मोठे कार्य केले. खासदार कुकडे यांनी, जुमदेव बाबांचे कार्य गरीबांच्या, समाजाच्या कल्याणासाठी होते.
व्यसनमुक्तीसाठी शासन असफल ठरले, तर मानवधर्माच्या माध्यमातून अनेकजण व्यसनमुक्त होवून सुखी झाल्याचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले यांनी अध्यक्षीय भाषणातून सेवकांचे दु:ख दूर कसे झाले याचे उदाहरण देवून तत्वाचे विश्लेषण केले. प्रास्ताविक मंडळाचे सचिव मोरेश्वर सार्वे यांनी केले.
यावेळी शिवानी बुरडे यांच्या चमुचा स्वागतनृत्य सादर करण्यात आला. तसचे मोहगाव देवी येथील अर्पिता आंबिलकर व तिच्या संचाने नृत्य सादर केला. यावेळी मंडळाकडून खासदार मधुकर कुकडे, वर्षा पटेल, राजू कारेमोरे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, के. के. पंचबुध्दे आदींचा सत्कार शाल श्रीफळ देवून करण्यात आला. नगरात शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात प्रथम क्रमांक गौरव पोटभरे यांना देण्यात आला. द्वितीय देवेंद्र नागफासे जांब, तृतीय अरुण आकरे निमखेडा, चतुर्थ रामकृष्ण बुराडे मुंढरी, पाचवा सुनिल ठाकरे बेरडीपार, सहावा रुपेश आथीलकर पारडी, सातवा रघुनाथ इलमे भिकारखेडा यांना रोख रक्कम व स्मृती चिन्ह देण्यात आला. प्रोत्साहन बक्षीस सहसराम कुकडे, रामेश्वर बिलवने, वसंता मोहनकर, ईश्वर पोटफोडे, जयराम माहुले यांना देण्यात आला. सेवक मंडळाच्यावतीने आध्यातिम्क प्रमुख लताताई बुरडे यांना आध्यात्मिक रत्न या पदवीने सन्मानित करण्यात आले.
सेवक संमेलनात भंडारा, गोंदिया, नागपूर, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणाहून सुमारे पन्नास ते साठ हजार सेवक मंडळी उपस्थित होते.