ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार अभ्यासाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 12:37 AM2017-04-20T00:37:56+5:302017-04-20T00:37:56+5:30

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असून भावी पिढीला आधुनिक तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता....

Opportunity for students to get education in rural areas | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार अभ्यासाची संधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार अभ्यासाची संधी

Next

नाना पटोले : विर्शी येथे डिजिटल शाळा कार्यशाळा
साकोली : जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असून भावी पिढीला आधुनिक तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता शासनाने डिजिटल शाळेचे धोरण अवलंबिले आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटलायझेशन करण्याचे आमचे ध्येय असून शेतकरी, शेतमजूर यांच्या गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याचे आमचा मानस असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
साकोली तालुक्यातील विर्शी येथे डिजिटल शाळेविषयी कार्यशाळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार राजेश काशिवार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, मुख्य कार्यपालन अधिकारी शरद अहिरे, साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, पंचायत समिती सभापती धनपाल उंदिरवाडे, उपसभापती लखन बर्वे, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, रेखा वासनिक, तहसिलदार अनिल खडतकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एम.संखे, खंड विकास अधिकारी श्री. तडस, विशीर्चे सरपंच डॉ. निमराज कापगते, पोलीस निरीक्षक गायकवाड उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले, या परिसरात शेतकरी, शेतमजूर मोठया प्रमाणात असून त्यांना आपल्या मुलांच्या दजेर्दार शिक्षणावर निधी खर्च करणे जड जाते. याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात डिजीटल शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून डिजीटल योजनावर २५ टक्के निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्वत: ग्रामसभेद्वारे अधिक निधीची मागणी करु शकते,, असे खासदार पटोले यांनी सांगितले. भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत ७६७ गावांपैकी ४२० शाळेत डिजीटल प्रणाली सुरु झालेली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना डिजीटल प्रणालीचे शिक्षण देऊन गुणवंत विद्यार्थी घडवावे, असे सांगून नाना पटोले म्हणाले, पोलीस विभागाने जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे सुरू करून चांगल्या उपक्रमाला चालना दिली आहे. यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी आमदार राजेश काशिवार म्हणाले, या क्षेत्रातील ७१ टक्के शाळांचे डिजीटलायझेशन झाले आहे. या प्रणालीमुळे प्रगतीशिल भावी पीढी घडविण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचा लाभ घ्यावा. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एमपीएसी व युपीएससी स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शरद अहिरे, उमेश वर्मा, पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी डिजीटल शिक्षण प्रणालीविषयी मार्गदर्शन केले. या निमित्ताने डिजीटल शाळा निर्मितीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
एनएमएमएस परीक्षेत जिल्हयात प्रथम श्रेणीत पात्र ठरलेले विद्यार्थी मोनीष राजेंद्र पटले व श्रेणीत पात्र ठरलेले प्रशीक विनेश गणवीर यांना भेट वस्तु देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमापूर्वी संपूर्ण विर्शी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यशाळेत सुशील कोरे यांनी प्रोजेक्टरद्वारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक विर्शीचे सरपंच डॉ. निमराज कापगते यांनी केले. संचालन राकेश झोडे व टी. आय पटले यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, व परिसरातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Opportunity for students to get education in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.