उपवनसंरक्षकांचा लिलावाचा आदेश डावलला

By admin | Published: August 24, 2016 12:14 AM2016-08-24T00:14:11+5:302016-08-24T00:14:11+5:30

कोका विश्रामगृहाचे निघालेले लाकुड साहित्य गडेगाव आगारात लिलाव करावे असे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रविणकुमार यांनी बजावले होते.

The order of the auctioneers was ordered | उपवनसंरक्षकांचा लिलावाचा आदेश डावलला

उपवनसंरक्षकांचा लिलावाचा आदेश डावलला

Next

प्रकरण कोका विश्रामगृहाच्या साहित्याचे : प्रकरण दडपण्याचा खटाटोप सुरूच
प्रशांत देसाई भंडारा
कोका विश्रामगृहाचे निघालेले लाकुड साहित्य गडेगाव आगारात लिलाव करावे असे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रविणकुमार यांनी बजावले होते. या आदेशाला डावलून तेथील सर्व साहित्य भंडारा येथे बोलावून त्याची अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे.
भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांनी कोका विश्रामगृहाचे काम सुरु असताना त्यातून निघालेले सर्व लाकूड साहित्य एकत्र जमा करावे व ते गडेगाव आगारात आणून लिलाव करावा. लिलावातून मिळालेले पैसे वनविभागाच्या खात्यात जमा होईल असा त्यांचा उद्देश होता. मार्च महिन्यात काढलेल्या या पत्राची विद्यमान वनक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी पत्राची दखल न घेता त्यांचे आदेश डावलले.
सर्व लाकूड साहित्य भंडारा येथे पाठवावे असे लेखी आदेश वनक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी कोका येथील वनपाल डब्लू. आर. खान यांना दिले. या आदेशानुसार खान यांनी शासकीय ट्रकने सर्व लाकूड साहित्य भंडाऱ्यात पाठविले. त्यानंतर या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.
यातील काही साहित्य येथील शासकीय वसाहतीत लावण्यात आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. एकंदरीत लाकूड साहित्यामुळे वनविभागातील या अधिकाऱ्याचे अनेक प्रकरण आता वनकर्मचाऱ्यांमध्ये चर्चिली जात आहे.

मेश्राम यांची कोका येथे भ्रमंती
मागील दोन दिवसांपासून लोकमतमध्ये कोका येथील विश्रामगृहाच्या लाकडांची मालिका प्रकाशित झाली. आजही प्रकाशित झालेले वृत्त वाचल्यानंतर त्यांनी सकाळी १०.३० वाजता ‘मुढ फ्रेश’ करण्याकरिता कोका वनविभागाचे कार्यालय गाढले. तेथील कर्मचाऱ्यांसह त्यांनी दुपारी १२.३० पर्यंत कोका अभयारण्यात भ्रमंती करून दुपारी भंडारा येथे पोहचले.
लिपिकाला खडेबोल सुनावले
वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांचे प्रकरण ‘लोकमत’ने प्रकाशित केले. दरम्यान त्यांनी बदलीसाठी अर्ज सादर केला. या बाबीची पुष्टी करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने मेश्राम यांना विचारणा केली. यावर त्यांनी संबंधित लिपिक गणवीर यांना सोमवारी सायंकाळी भ्रमणध्वनीवरून चांगलेच खडे बोल सुनावल्याची चर्चा आज दिवसभर वनविभागात सुरु होती.

लिलावाबाबत उपवनसंरक्षकांचे पत्र होते. सर्व साहित्याची लिलावाची परवानगी मिळाली. मात्र त्यानंतर क्वॉटरला लाकूड साहित्य लागत असल्याने सर्व साहित्य भंडारा येथे बोलाविले. माझे काम इमाने इतबारे सुरु आहे. मात्र माझ्यावर ताशेरे ओढल्या जात आहे. चोरी जात असल्याने यातील साहित्य माझ्या क्वॉर्टरमध्ये ठेवण्यात आलेले आहे.
- संजय मेश्राम,
वनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा.

Web Title: The order of the auctioneers was ordered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.