ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्तीचे आदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:56 PM2018-11-26T22:56:34+5:302018-11-26T22:56:48+5:30

ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेत अडचणी निर्माण होणाºया गावातच निपटारा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या दोन वषार्पासून अद्यापही रखडल्या असून पात्र उमेदवार नियुक्त्या प्रतिक्षेत आहेत.

Order the Village Electromagnetic Appointment | ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्तीचे आदेश द्या

ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्तीचे आदेश द्या

googlenewsNext
ठळक मुद्देखंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन : दोन वर्षांपासून मागणी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेत अडचणी निर्माण होणाºया गावातच निपटारा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या दोन वषार्पासून अद्यापही रखडल्या असून पात्र उमेदवार नियुक्त्या प्रतिक्षेत आहेत.
ग्रामविकास विभाग शासन निर्णय अन्वये ३००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतला विद्युत व्यवस्थापकाचे १ पद मंजूर करण्यात आले होते. सदर बाबतीत विद्युत व्यवस्थापकाचे काम करण्यास इच्छुक व पात्र उमेदवारांबाबतचे आवश्यक शैक्षणीक प्रमाणपत्राची पळताळणी एक वर्षापूर्वी विद्युत भवन भंडारा येथे झालेली आहे. परंतु २१४ उमेदवारांची विद्युत व्यवस्थापक पदाकरिता शैक्षणीक दृष्ट्या पात्र असून सुद्धा मागील दोन वषार्पासून नियुक्त्या अद्यापही रखडलेल्याच आहेत.
प्रशासनाने याकडे गांभीयार्ने लक्ष देऊन तत्काळ नियुक्ती आदेश पत्र उमेदवारांना द्यावे, याचे स्मरणपत्र मा. खंडविकास अधिकारी साहेब तथा विस्तारिकरण अधिकारी युवारज कुथे पंचायत समिती तुमसर यांना देण्यात आले. ३० आॅगस्ट २०१७ ला सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले होते. परंतु त्या पत्रावर अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही आहे त्यामुळे हे स्मरणपत्र देण्यात आले आहे.
प्रतीक्षेत असलेया उमेदवारांचे नियुक्त्या नाही झाले तरशिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावे. या स्मरणपत्राची प्रत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना पाठविण्यात आले आहेत.
यावेळी निवेदन देताना शिवसेना भंडारा जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, विनोद बानेवार, सुमेद बंसोड, राहुल सोनेवाने, सेवक दमाहे, रुपेश बिसने, ज्ञानेश्वर कटरे, निलेश कोकासे, लक्ष्मीकांत नारनवरे, संदीप बुधे, प्रशांत सोनवाने शुभम लासुंते, नागोराव बनकर, राजेंद्र पारधी, सिनेश राउत, कृष्ण पारधी, शुशील आम्बुले, जितेंद्र कटरे, निलेश तांडेकर, सूरज सरोदे सह प्रतीक्षेत असलेले उमेदवार उपस्थित होते.

Web Title: Order the Village Electromagnetic Appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.