आदिवासी बँक खातेदारांना व्यवस्थापकांचे ‘चालते व्हा’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:49 PM2017-12-05T23:49:00+5:302017-12-05T23:49:14+5:30

एका राष्ट्रीयकृत बँकेत खातेदार तथा त्यांचे नातेवाईक खातेपुस्तक नोंदविण्याकरिता गेल्यावर व्यवस्थापकांनी काही आदिवासी खातेदारांना ‘चालते व्हा’ असे आदेश दिल्याने बँक व्यवस्थापक व आदिवासी नेते यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

Orders for Tribal Bank Accountants 'To Get It' | आदिवासी बँक खातेदारांना व्यवस्थापकांचे ‘चालते व्हा’चे आदेश

आदिवासी बँक खातेदारांना व्यवस्थापकांचे ‘चालते व्हा’चे आदेश

Next
ठळक मुद्देआदिवासी नेते व व्यवस्थापकांत शाब्दिक चकमक : पोलिसात तक्रार देण्याची व्यवस्थापकाची धमकी, आंदोलनाचा इशारा

आॅनलाईन लोकमत
तुमसर : एका राष्ट्रीयकृत बँकेत खातेदार तथा त्यांचे नातेवाईक खातेपुस्तक नोंदविण्याकरिता गेल्यावर व्यवस्थापकांनी काही आदिवासी खातेदारांना ‘चालते व्हा’ असे आदेश दिल्याने बँक व्यवस्थापक व आदिवासी नेते यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. पोलिसात तक्रार करण्याची धमकी बँक व्यवस्थापकांनी आदिवासी नेते अनिल टेकाम यांना दिली. आदिवासी बांधवांचा अवमान करणाºया बँक व्यवस्थापकावर कारवाईची मागणी टेकाम यांनी केली आहे.
गोबरवाही येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. सोमवारी येथे आठवडी बाजार भरतो. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येथे येतात. सोमवारी बँकेत खातेदारांची मोठी गर्दी होती. अनेक जण खातेपुस्तक नोंदविण्याकरिता बँकेत आले होते. ज्यांचे खाते पुस्तक आहे त्यांचीच नोंदणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यापूर्वी खातेपुस्तक नातेवाईक तथा मित्रमंडळीने आणल्यानंतर ती नोंदविली जात होती. ही माहिती आदिवासी आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल टेकाम यांनी शाखा व्यवस्थापक अंकीतकुमार गुप्ता यांना दिली. परंतु व्यवस्थापक गुप्ता यांनी ते नाकारले.
अनिल टेकाम व व्यवस्थापक गुप्ता यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दरम्यान व्यवस्थापक यांनी पोलिसात तक्रार देण्याची धमकी टेकाम यांना दिली. शेकडो महिला व पुरूष खातेदार बँकेत उपस्थित होते. आदिवासी महिला व पुरूषांना बँक व्यवस्थापक गुप्ता यांनी चालते व्हा असे बोलून शिविगाळ केल्याचा आरोप अनिल टेकाम यांनी केला आहे. संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई न केल्यास आदिवासी बांधवासोबत आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी सेलचे महासचिव अनिल टेकाम यांनी दिला आहे.

सोमवारी दुपारी गोबरवाही येथील स्टेट बँकेत आदिवासी महिला व पुरूषांना बँक व्यवस्थापकाने चालते व्हा असे बोलून अपमान केला. खाते पुस्तक नोंदविण्या संदर्भात त्यांनी कारवाईची धमकी दिली. याप्रकरणी मुंबई येथील मुख्य कार्यालयात तक्रार केली आहे. बँक व्यवस्थापकावर कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
-अनिल टेकाम, जिल्हा महासचिव आदिवासी आघाडी सेल भंडारा जिल्हा.

Web Title: Orders for Tribal Bank Accountants 'To Get It'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.