आयुध निर्माणी ते ठाणा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:45 PM2018-07-10T22:45:53+5:302018-07-10T22:46:09+5:30

केंद्रीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जा ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे.

Ordnance Factory Thane Road Impairment | आयुध निर्माणी ते ठाणा रस्त्याची दुरवस्था

आयुध निर्माणी ते ठाणा रस्त्याची दुरवस्था

Next
ठळक मुद्देकामगार संघटनांचेही दुर्लक्ष : खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : केंद्रीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जा ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वरिष्ठ विभागाने या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
आयुध निर्माणी भंडारा येथील कारखान्यात राष्ट्रीय महामार्ग सहा ठाणा टी पॉइंट पासून ते कारखान्यापर्यंत पाच किलोमिटरचा रस्ता येथील कर्मचारी, शळकरी, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, व्यापारी या रस्त्याचा वापर करीत असतात. या मार्गाने जड वाहतूक नियमित होत असतो.
सुमारे तीन महिन्यापूर्वी जुना चेक पोष्ट विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१९ पर्यंत काही प्रमाणात रस्त्याची डागडुजी करीता कंत्राट देऊन दुरुस्ती करण्यात आली. मात्र आज घडीला या रस्त्यावर असंख्य ठिकाणी खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावरून कर्मचारी व शाळकरी मुल्ें मुली दुचाकी व सायकलद्वारे प्रवास करताना अनेक अडचणींवर मात करून वाहन चालवावे लागत आहे. रात्री अपरात्री विद्युत पथ दिवे बंद असताना मार्ग निट समजत नाही. खोल खड्ड्यामुळे वाहन चालक रस्ता पडण्याचा प्रकार घडत आहे. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. येथील कार्यरत कामगार संघटनांचे कर्मचाºयांच्या जीवावर बेतणाºया रस्त्याकडे दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने जाब विचारून दुरुस्तीसाठी दुर्लक्ष करीत असल्याचे समजते,

Web Title: Ordnance Factory Thane Road Impairment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.