आयुध कर्मचारी संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:06+5:302021-06-19T04:24:06+5:30

गत काळात कामगार संघटनेने देशव्यापी बेमुदत संप सुरू केले होते. परंतु सरकारी पक्ष व कामगार संघटनेमध्ये वाटाघाटी झाल्यामुळे मुख्य ...

Ordnance staff holding | आयुध कर्मचारी संघाचे धरणे

आयुध कर्मचारी संघाचे धरणे

Next

गत काळात कामगार संघटनेने देशव्यापी बेमुदत संप सुरू केले होते. परंतु सरकारी पक्ष व कामगार संघटनेमध्ये वाटाघाटी झाल्यामुळे मुख्य कामगार आयुक्त (मध्यवर्ती) यांनी एक सामंजस्य बैठक घेतली. दोन्ही पक्षांना निर्देश दिले की, दोन्ही पक्ष (कर्मचारी आणि सरकार) यथास्थिती कायम ठेवतील. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयुध निर्माणाचे निगमीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशभरातील कामगार संघटनेने याचा विरोध केला. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी निर्णयाच्या विरोधात धरणे देण्यात आले

आयुध कर्मचारी संघ भंडाराच्या बीपीएमएसच्या आवाहनानुसार राजेश बिसेन, डी.यू. डहरवाल यांच्या नेतृत्वात ऑर्डनन्स फॅक्टरीच्या निगमीकरण निषेधार्थ कारखान्याच्या मुख्य गेटसमोर एक काळा दिवस साजरा करण्यात आला. ज्यात मोठ्या संख्येने कारखाना कामगार आणि अन्य युनियन कामगार उपस्थित होते. यात महामंत्री रविकांत अहिरवार, कार्याध्यक्ष शेख़ आबिद, योगेश झंझाड, विनोद चटप, राजू दिपटे, दीपक डोलार, पंकज साकुरे, नीरज चौधरी, श्यामल लांजेवार, चंदन कुशवाह, भानू कुशवाह, दीपक सिंगाडे, लोकेश चेटूले, धकाते, रवींद्र तिजारे, एस. बोंद्रे, देवेश ठोंबरे, गिरडकर, शरद बांते, नितिन मंदूरकर, छगन खंडाईत, अंगद डेकाटे, ओ.पी. धुर्वे, राधेश्याम भोंदे, दिनेश ठवकर, चंदू हटवार, परमानंद पटले, राजेश मीणा, राजाराम, पंकज रहांगडाले, जितेंद्र भोंगाडे, अमोल उमाटे, कैलाश सोनी, संजय मेहर, नाना गायधने, अरविंद नेवारे, संजय राऊत, संतोष कुथे आदींचा समावेश होता.

Web Title: Ordnance staff holding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.