शेती शाळेतून महिला शेतकऱ्यांनी घेतले सेंद्रीय शेतीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:00+5:302021-02-14T04:33:00+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत परसोडी येथे आयोजित शेती शाळेत महिला शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क व जीवामृत बनविण्याचे प्रत्यक्षिक दाखविताना त्यांनी ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत परसोडी येथे आयोजित शेती शाळेत महिला शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क व जीवामृत बनविण्याचे प्रत्यक्षिक दाखविताना त्यांनी सांगितले. यावेळी प्रशिक्षणासाठी भंडारा मंडळ अधिकारी दीपक आहेर, पर्यवेक्षक माया कांबळे, परसोडी येथील कृषिमित्र जागेश्वर वंजारी, प्रगतशील शेतकरी धनविजय वंजारी, चित्रलेखा वंजारी, लता वंजारी, मनीषा वंजारी, भारती कुंडले, कल्पना राखे, विवेक वैरागडे, प्रभाकर वंजारी, अर्चना वानखेडे, प्रमिला वंजारी, कविता हटवार, चंद्रकला हटवार यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी जागेश्वर वंजारी यांच्या पॅक हाउसवर सेंद्रीय शेतीसाठी महिला शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क व जीवामृत बनविण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक रेणुका दराडे यांनी दाखविले. यानंतर, रब्बी हंगामातील हरभरा पिकामध्ये उभारलेले पक्षीथांबे व कामगंध सापळा याचे महत्त्व सांगून कामगंध सापळ्यात अडकलेल्या पतंगांचे निरीक्षणे घेऊन त्यातील पतंगाविषयी सखोल मार्गदर्शन करून, मिरची पिकावर येणाऱ्या कीड रोगाविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना ऑनलाइन योजना, शेतीपूरक उद्योगांना असलेल्या अनुदानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. संचालन चित्रलेखा वंजारी यांनी केले, तर आभार कृषिमित्र जागेश्वर वंजारी यांनी मानले.
बॉक्स
जीवामृत, दशपर्णी अर्क शेतीसाठी फायदेशीर
शेतकऱ्यांना आपल्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या वनस्पती रुई, निरगुडी,कनेरी, कडुनिंब, पपई, एरंडी, गुळवेल, घाणेरी, मिरचीचा ठेचा, गाईचे शेन, गोमूत्र, लसणाचा पाला, करंज या झाडांचा प्रत्येकी दोन किलो पाला घेऊन एका ड्रममध्ये २०० लीटर पाण्यात भिजत ठेवणे व दररोज काढणे कशा पद्धतीने ढवळण्याची प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. भंडारा तालुक्यात २१ गावांमध्ये ही प्रात्यक्षिके दाखविण्यात येत असल्याने, आता सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार असल्याचे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले.