संघटनेने दिला दहा दिवसांचा ‘अल्टीमेटम’

By admin | Published: August 23, 2016 01:08 AM2016-08-23T01:08:32+5:302016-08-23T01:08:32+5:30

भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Organization gives 10-day ultimatum | संघटनेने दिला दहा दिवसांचा ‘अल्टीमेटम’

संघटनेने दिला दहा दिवसांचा ‘अल्टीमेटम’

Next

भंडारा : भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याविरुध्द आज वनकर्मचारी संघटनेची बैठक झाली. यात त्यांनी निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी उपवनसंरक्षक यांना दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
उपवनसंरक्षक कार्यालयातील कॅम्प हाऊस येथे वनरक्षक बी.एस. कुंभारे व वरिष्ठ लिपीक एच. वाय. धार्मिक या दोघांवर १४ दिवसांचा अंतरावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या दोघांवरही वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाईपुर्वी दोघांचेही स्पष्टीकरण घेणे गरजेचे होते. मात्र त्यांची बाजू ऐकूण न घेता वनाधिकारी यांनी दोघांवरही निलंबनाची कारवाई केली. याविरुध्द आज सोमवारला महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेची तातडीची बैठक बोलविण्यात आली.
या बैठकीला केंद्रीय अध्यक्ष विजय मेहर, जिल्हाध्यक्ष टी. एच. घुले, आय. एच. काटेखाये, के. एम. नरटंगे, एम. जे. वैद्य, मिलिंद घोरमारे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत निलंबित कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई ही सुडबुध्दीची असून ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. सदर कारवाई १० दिवसात मागे घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आला. कारवाई मागे न घेतल्यास दहा दिवसानंतर अधिकाऱ्यांविरुध्द धरणे, असहकार आंदोलन, साखळी उपोषण अशी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. यासोबतच सोसायटीची नियमित वेतनातून होणारी कपात बंद केल्याने आर्थिक भुर्दंड पडत आहे. ती कपात पुर्ववत सुरु करावी अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली. एकंदरीतच वनकर्मचारी संघटना निलंबित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली असून वनाधिकारी आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहे. बैठकीला आय.एम. सैय्यद, व्ही. टी. बागडे, यु. बी. हटवार, डब्ल्यू. के. खान, अतुल राऊत, एम. डी. मेश्राम, वाय. टी. ठवकर, गौरी नेवारे, नान्हे, एन. डब्ल्यू कारेमोरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Organization gives 10-day ultimatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.