उत्पादन वाढीसाठी संघटना तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:43 AM2019-08-26T00:43:09+5:302019-08-26T00:43:42+5:30
आयुधनिर्माणीचे निगमीकरण व खासगीकरण करण्याची सुरुवात विद्यमान केंद्रसरकार करणार होती. याला हेरुन केंद्र सरकारने संवेदनशील व देशाची सुरक्षा घडी बिगडू देऊ नये यासाठी सदर विभागाचे निगमिकरण व खासगीकरण करु नये यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तीनही महासंघानी आपापल्या परीने आंदोलन उभारुन केंद्र सरकारला चेतावणी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : देशांतर्गत आयुध निर्माणीच्या ४१ आयुध निर्माणीत मागील पाच दिवसापासून सुरु असलेल्या संप केंद्र सरकार व राष्ट्रीय स्तरावरील महासंघ व सिड्रा यांच्यातील चर्चेअंती व लेखी आश्वासनानुसार तुर्तास मागे घेण्यात आला आहे. यात उत्पादन १मता वाढीसाठी संघटना तयार असल्याचे समजते.
देशाची संरक्षणाची महत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. त्या आयुधनिर्माणीचे निगमीकरण व खासगीकरण करण्याची सुरुवात विद्यमान केंद्रसरकार करणार होती. याला हेरुन केंद्र सरकारने संवेदनशील व देशाची सुरक्षा घडी बिगडू देऊ नये यासाठी सदर विभागाचे निगमिकरण व खासगीकरण करु नये यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तीनही महासंघानी आपापल्या परीने आंदोलन उभारुन केंद्र सरकारला चेतावणी दिली. मात्र याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. शेवटी राष्ट्रीय स्तरावरील महासंघानी एकत्री येऊन देशव्यापी ३० दिवसाचा संप पुकारला होता.
तिनही महासंघ व सिडरा यांना चर्चेसाठी केंद्र सरकारने पाचारण केले. यात आॅल इंडिया डिफेन्स एम्प्लाईज फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव सी. श्रीकुमार, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय महासचिव मुकेश सिंग व इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव आर. श्रीनिवासन व सिडराचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार निगमिकरणाद्वारे ३० हजार कोटी उत्पादनाचे लक्ष आम्ही सरकारमध्ये राहुन आयुध निर्माणीधीन अधिकारी यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला. त्यावर उच्चस्तरीय नियंत्रण समिती नेमुण त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रस्ताव महासंघाने केंद्र सरकारला सांगितले आहे.