किसान सभेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:46 AM2018-04-12T01:46:11+5:302018-04-12T01:46:11+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेचे १० एप्रिल रोजी भंडाऱ्यात आगमन झाले.
शहीद स्मारक भंडारा येथे १० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता किसान सभेच्या वतीने सभेचे आयोजन केले. सर्वप्रथम शहीद स्मारक भंडारा येथे स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या शहीदांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि हुतात्मा महादेव गजापुरे, गोपाळराव चुटके, झिंटू बोवा, 'अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.
अभिवादन सभेत माजी खासदार नाना पटोले, रघुनाथ दादा पाटील, गणेश जगताप, किशोर ढबाले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कालीदास आपटे यांनी प्रस्तावना केली तर समारोप किसान सभेचे भंडारा जिल्हा सचिव माधवराव बांते यांनी केले.
जागृती यात्रेत दिनकर दाभाडे, आनंद भालेकर, आनंद शिंदे, ज्ञानेश्वर गाडे, प्रशांत पवार होते तर भंडारा जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सदानंद इलमे, शिवकुमार गणवीर, हिवराज उके, जयप्रकाश मसरके, नितीन मोहारे, मधुकर बुरडे, वामनराव चांदेवार, गजानन पाचे, हरिदास जांगडे, देवीदास कानेकर, नरेंद्र रामटेके आदी उपस्थित होते.