मुजबी येथे मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:15+5:302021-01-18T04:32:15+5:30
भंडारा : तालुक्यातील मुजबी येथील रक्षक क्रिकेट क्लब मुजबीच्या वतीने १७ जानेवारीपासून मोन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
भंडारा : तालुक्यातील मुजबी येथील रक्षक क्रिकेट क्लब मुजबीच्या वतीने १७ जानेवारीपासून मोन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसिद्ध उधोगपती पंकज सारडा, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, सरपंच नंदकुमार वासनिक, उपसरपंच दीपक बेदूरकर, ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत डोंगरे, प्रदीप भोयर,राजश्री नारनवरे, दिलीप कांबळे, निर्मला कोल्हे, शालू वकलकार, किरणताई कांबळे, नंदाबाई मेश्राम, ग्रामसेवक व्ही. एस. तलमले, तलाठी सौं. एस. एस.हलमारे, पोलीसपाटील ममता निंबार्ते आदी उपस्थित होते.
क्रिकेट सामने सहा ओव्हरचे असून, कोठारी प्रॉडक्ट मुजबीतर्फे प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार, ब्लू पँथर ग्रुप मुजबीकडून द्वितीय पुरस्कार सात रुपये, रक्षक क्रिकेट क्लबतर्फे तृतीय पुरस्कार रुपये पाच हजार रूपयांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय फायनलचे आकर्षक पुरस्कार मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरिज, बेस्ट बॉलर, बेस्ट कॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट विकेटकीपर आदी पुरस्काराने खेळाडूचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच तीन चौकार, तीन षट्कार तसेच तीन विकेटकरिता विजय निंबार्ते, रमेश निंबार्ते व शेखर गेडाम यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०१ रूपयांचे आकर्षक बक्षीस देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येणारे आहे.
या क्रिकेट स्पर्धेकारिता रक्षक क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अभिजित मेश्राम, उपाध्यक्ष राहुल शहारे, सचिव निखिल ढोमणे, सहसचिव क्षितिज मेश्राम, रोहित कांबळे, किस्मत गेडाम, सोहम मेश्राम, धम्मदीप चव्हाण, कुणाल बांगर, अल्पेश गेडाम,अर्पित लिड, हर्ष गेडाम,अंकित बोरकर, अनिकेत गणवीर,आर्यन मेश्राम, पीयूष सेल्लारे, प्रणय बोरकर, प्रज्वल टेंभुर्णे, आदेश गेडाम, अंशुल मेश्राम, पारस शेंडे, सुरेंद्र डोंगरे, उद्देश भोवते, प्रियरंजन सिंह, तुषार वासनिक, विराज गायकवाड, सौरभ चव्हाण, प्रतीक कांबळे, सत्यम वाघाये, अजित रोडगे, युवक बेदरकर, उमाकांत बेदरकर, अतुल भोयर, गोलू निंबार्ते, स्वप्नील गणवीर, प्रज्वल चव्हाण, अंश मेश्राम, हिमांशू पाचरे, कैलास ठाकरे, शिशुपाल सपाटे, साहिल गेडाम, लंकेश रामटेके आदी सहकार्य करीत आहेत.