माहितीचा अधिकार कार्यशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 10:30 PM2018-01-07T22:30:58+5:302018-01-07T22:32:09+5:30
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा पोलिसांकरिता माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन पोलिस सभागृहात करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा पोलिसांकरिता माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन पोलिस सभागृहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पोलीस अधिक्षक विनीता सााहू, अपर पोलीस अधिक्षक रश्मि नांदेडकर तसेच यशदा संस्था पुणे येथील समन्वयक वानखेडे, तसेच व्याख्याते प्रभुणे, अग्रवाल हे उपस्थित होते.
यावेळी कार्यशाळेला पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना महितीच्या अधिकाराविषयीचे संपुर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. सदर कार्यशाळेमुळे सर्वांच्या ज्ञानात चांगली भर पडेल.
त्यामुळे माहिती अधीकारांतर्गत विविध कालावधीत माहिती मागणाऱ्यास अपेक्षीत अचुक माहिती पाठविणे सोयीचे होईल. याबाबत माहिती दिली.
यावेळी यशदा संस्था पुणे येथील व्याख्याते प्रभुणे यांनी आपल्या भाषणात माहितीचा अधिकार अनिनियम २००५ मधील आर.टी.अॅक्ट वापर माहिती अधिकार कायद्याचा इतिहास, स्वरुप, उद्दीष्टे व्याप्ती व कायदयातील महत्वाच्या संकल्पना समुचित शासन व सार्वजनिक प्राधिकरणाच्या जवाबदाऱ्या स्वयंप्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती (१ ते १७ बाबी) तसेच (कलम ४०) स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकट नमुने जन माहिती अधिकारी पदनिर्देशन (कलम ०५) इ. विषयावर माहिती दिली.
यावेळी यशदा संस्था पुणे येथील कोआॅर्डीनेटर अग्रवाल यांनी माहिती मागविण्यासाठी अर्ज करणे अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया (कलम ६ ते ७) माहिती प्रकट करण्याचे अपवाद (कलम ८ ते ९) अशंत: द्यावयाची व त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट करण्याची कार्यपध्दती (कलम १० ते ११), माहिती आयुक्त अधिकार, कार्य व कर्तव्य (कलम १२ ते १८), प्रथम व द्वितीय अपील त्यावर करावयाची व शास्ती (कलम १९ ते २०), माहिती वैयक्तिक माहिती, जनहित व त्रयस्थ पक्ष या संदर्भातील महत्वाचे न्यायनिवाडे, संकीर्ण कलम २१ ते ३१, जन माहिती यांनी करावयाचा पत्रव्यवहार व विविध प्रकारचे नमुने प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी करावयाचा पत्रव्यवहार व निकालपत्र याविषयावर माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला पोलीस उपअधिक्षक कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड, पोनी. सिडाम, पोनी. चव्हाण, ढोबळे, नेवारे, सपोनि कायंडे, राखीव पोलीस निरीक्षक वर्मा, पोलीस अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. संचालन पोलीस उपअधिक्षक कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन वानखेडे यांनी केले.