काशीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन
By admin | Published: September 10, 2015 12:25 AM2015-09-10T00:25:09+5:302015-09-10T00:25:09+5:30
साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळा (राजेश) काशीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
साकोली : साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळा (राजेश) काशीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आमदार निधी अंतर्गत साकोली तालुक्यातील किन्ही, एकोडी, पिंडकेपार, सेंदूरवाफा, उमरी, परसोडी, कुंभली, सुकळी, पळसगाव, लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ), गडेगाव, चान्ना, लाखोरी, किटाळी, मेंढा (भूगाव), लाखांदूर तालुक्यातील मळेघाट, लाखांदूर, मोहरणा, मांढळ, विरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल प्रोजेक्टरचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सेंदूरवाफा प्राथमिक शाळेत गुरुवारला दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तरुण वर्गाला शैक्षणिकदृष्ट्या प्रेरणा मिळावी या दृष्टिने सरश्री यांच्या पुस्तकसंचाचे वाघाये कनिष्ठ महाविद्यालय एकोडी, चैतन्य महाविद्यालय बाम्पेवाडा, एम.बी. पटेल कॉलेज साकोली, एन.पी. वाघाये कॉलेज लाखनी, समर्थ महाविद्यालय लाखनी, विदर्भ महाविद्यालय लाखनी, एन.पी.के. कॉलेज किटाळी, सिद्धार्थ महाविद्यालय लाखांदूर, वाघाये कॉलेज लाखांदूर, हिरालाल खोब्रागडे महाविद्यालय डोकेसरांडी, हिरालाल खोब्रागडे महाविद्यालय विरली, गंगाराम महाविद्यालय मासळ, निर्धनराव वाघाये महाविद्यालय दहेगाव, दैठणकर महाविद्यालय बारव्हा येथे कार्यक्रम होईल.
यावेळी नागपूर येथील डॉ.हेडगेवार रक्तपेढी व स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यात दिघोरी (मोठी), तैलिक समाज सभागृह मासळ, आरोग्य केंद्र बेलाटी, आरोग्य केंद्र कुडेगाव, आरोग्य केंद्र बारव्हा, आरोग्य केंद्र सरांडी पुयार, संत तुकडोजी महाराज सभागृह, लाखांदूर, साकोली तालुक्यात सेंदूरवाफा ग्रामपंचायत कार्यालय, बाजार चौक एकोडी, आरोग्य केंद्र विर्सी, सावरबंध ग्रामपंचायत कार्यालय, सानगडी, शिवमंदिर वडद, ग्रामपंचायत कार्यालय साकोली, जिल्हा परिषद हायस्कुल, लाखनी क्रीडा संकुल, समर्थनगर लाखनी, पिंपळगाव आरोग्य केंद्र मुरमाडी, आरोग्य केंद्र सालेभाटा, आरोग्य केंद्र पालांदूर, साई मंदिर बाजार चौक आणि पोहरा ग्रामपंचायत कार्यालयात येथे आयोजित करण्यात आला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)