आभासी खुल्या हिंदी कविसंमेलनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:29+5:302021-06-24T04:24:29+5:30
या कविसंमेलनाच्या उद्घाटक सुप्रसिद्ध कवयित्री अर्चना मोहनकर या होत्या. संमेलनाचे अध्यक्ष हिंदीचे सुप्रसिद्ध कवी शरद कोकास (दुर्ग) ...
या कविसंमेलनाच्या उद्घाटक सुप्रसिद्ध कवयित्री अर्चना मोहनकर या होत्या. संमेलनाचे अध्यक्ष हिंदीचे सुप्रसिद्ध कवी शरद कोकास (दुर्ग) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. कृष्णा पानवान उपस्थित होते.
या कविसंमेलनाला विविध जिल्ह्यांतील कवींनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात प्रामुख्याने अनुपमा जाधव-पालघर, सुरेश मोटघरे (गडचिरोली), रत्नाकर सुखदेवे (भंडारा), रतन लांडगे (पवनी), सोनाली शहारे (ब्रह्मपुरी), प्रा. शीलवंत मडामे (भंडारा), डॉ. ईश्वर नंदापुरे (नागपूर), विनोद मोहबे (गोंदिया), उमा उन्मुक्त (गोंदिया), श्रावण भवर (जालना), गणेश कुंभारे (ब्रह्मपुरी), राज नखाते (नागपूर), राज जांभूळकर (पुणे), सिद्धार्थ चौधरी (भंडारा) या कवीने सहभाग नोंदविला होता. या आभासी हिंदी कवी संमेलनाचे आयोजन मुन्नाभाई नंदागवळी, प्रा. शीलवंत मडामे, रत्नाकर सुखदेवे यांनी केले होते. कविसंमेलनाला मान्यवरांचा परिचय आणि प्रास्ताविक सिद्धार्थ चौधरी यांनी केले. उषा घोडेस्वार यांनी संचालन, तर रतन लांडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.