मृत्यूचे तांडव सुरूच, २२ जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:58+5:302021-04-16T04:35:58+5:30
गुरुवारी ५१५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यातील ६०३, मोहाडी ८८, तुमसर ८९, पवनी १३१, लाखनी १६२, साकोली ...
गुरुवारी ५१५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यातील ६०३, मोहाडी ८८, तुमसर ८९, पवनी १३१, लाखनी १६२, साकोली १०७ आणि लाखांदूर तालुक्यात ८२ असे १२६२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ७२ हजार ४९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ३३ हजार ७२२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर २१ हजार १२६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४९४ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.
बॉक्स
सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात
जिलह्यात सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यातील झाली आहे. जिल्ह्यात ४९४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, त्यातून २४१ व्यक्ती एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी तालुक्यात ४४, तुमसर ७३, पवनी ५४, लाखनी २८, साकोली ३२, लाखांदूर तालुक्यात २२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.४६ टक्के असून, मृत्युदर १.४६ टक्के आहे.