मृत्यूचे तांडव! काेराेनाने तब्बल १३ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:07+5:302021-04-10T04:35:07+5:30

गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच मृतांची संख्या दाेन आकड्यात माेजली गेली. १ एप्रिल राेजी ...

The orgy of death! Kareena killed 13 people | मृत्यूचे तांडव! काेराेनाने तब्बल १३ जणांचा बळी

मृत्यूचे तांडव! काेराेनाने तब्बल १३ जणांचा बळी

Next

गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच मृतांची संख्या दाेन आकड्यात माेजली गेली. १ एप्रिल राेजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला हाेता. २ एप्रिल राेजी तिघांचा, ३ एप्रिलला चार, ४ एप्रिल राेजी एक, ५ एप्रिल राेजी नऊ, ६ एप्रिल राेजी आठ, ७ एप्रिलला नऊ, ८ एप्रिल राेजी तीन, शुक्रवार ९ एप्रिल राेजी तब्बल १३ जणांचा बळी गेला.

बाॅक्स

शुक्रवारी १२१७ पाॅझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा काेराेना बाधितांच्या संख्येने हजारचा आकडा पार केला. ९ हजार २२० व्यक्तींची चाचणी केल्यानंतर १२१७ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा ३८८, माेहाडी १४१, तुमसर २१८, पवनी २०७, लाखनी १३९, साकाेली ५२ आणि लाखांदूर तालुक्यातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३३ हजार ९८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात २५ हजार ८२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १६ हजार ७३१ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली असून, ३९४ व्यक्तींचा काेरेानाने बळी घेतला.

स्मशानभूमीत धगधगतात चिता

काेराेनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी भंडारा लगतच्या गिराेला येथे काेविड स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली आहे. दरराेज येथे चिता धगधगत असल्याचे दिसून येते. याठिकाणी एकावेळी १४ मृतांवर अंत्यसंस्काराची सुविधा आहे. आता दरराेज मृत्यूचा आकडा वाढत असल्याने अंत्यसंस्कार करण्यास अडचण येत आहे. नगरपरिषदेच्या अखत्यारित असलेल्या या स्मशानभूमीत नगर परिषदेचे कर्मचारी काेराेना नियमानुसार मृतांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.

Web Title: The orgy of death! Kareena killed 13 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.