...अन्यथा पालिकेसमोर बेशर्मची झाडे लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:32+5:302021-08-27T04:38:32+5:30
माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने सीएसआर निधीतून कोट्यवधी रुपयांचे तुमसर येथे नागरिकांच्या ...
माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने सीएसआर निधीतून कोट्यवधी रुपयांचे तुमसर येथे नागरिकांच्या मनोरंजनासाठी गांधी सागर उद्यान बांधण्यात आले. सात ते आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या गांधीसागर उद्यानाचे राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकारी, पदाधिकारी यांनी कौतुक केले. त्यामुळे न.प.ो नावलौकिकही झाले होते. चार वर्षांपूर्वी हे उद्यान शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. या उद्यानात मुले, महिला, आबालवृद्ध नागरिक फिरण्यासाठी आणि मनोरंजनासाठी येत होते, तर काही लोक मॉर्निंग वॉकला यायचे. शाळेतील मुले सहलीसाठी येत होते; परंतु आता नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची स्थिती बिकट झाली आहे. पालिका अध्यक्षांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. गांधी सागर उद्यानात चोहोबाजूंनी रानगवत उगवलेले आहे. मौल्यवान झाडे जमीनदोस्त झाली आहेत. चोहीकडे घाण आणि घाणच दिसून येते. उद्यानाला लावलेले कुंपण, ग्रील चोरीला गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला होता.
कोट
नगरपालिकेमध्ये २०० सफाई कामगार, १५० कर्मचारी, २५ पदाधिकारी, आणि स्वतः नगराध्यक्ष यांचे सहकारी आहेत. तुमसरात अनेक सामाजिक संस्था आहेत. पदाधिका्यांच्या एका आवाजावर हे सर्व एकत्रित होऊन एका दिवसात उद्यानाला पुनर्जीवित करू शकतात. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे दररोज नगर पलिकेसमोर अनोख्या पद्धतीने मय्यतचा वाजा ''डफऱ्या'' वाजवून व पाच बेशर्मची झाडे लावून यांचा निषेध करू.
- अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष, तुमसर.