क्षेत्राचा विकास हेच आपले कर्तव्य
By admin | Published: October 11, 2015 02:01 AM2015-10-11T02:01:53+5:302015-10-11T02:01:53+5:30
गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे.
आंधळगाव : गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे. विकासासाठी सर्वाेपरी मदत करणार असून हेच माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांनी केले.
तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत भवनात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, क्षेत्रातील विविध भागात रस्ते, पाणी, घरकुल, विधवा पेंशन, श्रावण बाळ, निराधार पेंशन, युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण, शिक्षण व आरोग्य संबंधी समस्या आहेत. क्षेत्रातील गरजू जनतेपर्यंत निस्वार्थ भावनेने मुलभूत गरजा पोहचविणे आहे. त्या करीता आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व संबंधीत यंत्रणेसोबत चर्चा सुरू आहेत. अध्यक्षस्थानी सरपंच उषा धार्मिक तर, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रामरतन खोकले, सचिव अशोक सार्वे, सदस्य कविता बुराडे, निलकमल गोंडाणे, वसुंधरा धार्मिक, रमेश कुंभारे, संजय मते, हुरेराबी पठाण, मधुकर कारेमोरे, बालचंद पाटील, हरिराम माटे गुरूजी, रामेश्वर हटवार, शालिक वखाडे, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य उमेश पाटील उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाठी सदानंद आकरे, गजभिये, गोपीचंद लांडगे, जगदीश कऱ्हाडे यांनी सहकार्य केले.संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी केले. (वार्ताहर)