आमच्या मातीतील चित्रपट हा आमचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 09:57 PM2018-12-28T21:57:38+5:302018-12-28T21:57:59+5:30
आमच्या मातीत तयार झालेला हा चित्रपट आमच्या सर्वासाठी अभिमानाचा क्षण आहे. मुंबई किंवा अन्य ठिकाणी बरीच साधने उपलब्ध असतात, मात्र भंडारा जिल्ह्यातील युवकांनी अल्प साधन सामुग्रीसह खुप सुंदर प्रयत्न देशभरातील चित्रपट क्षेत्रातील विविध भागातील लोकांना एकत्र करत केलेला आहे आणि 'हौसला और रास्ते' हा लघुपट साकारला, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अॅकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आमच्या मातीत तयार झालेला हा चित्रपट आमच्या सर्वासाठी अभिमानाचा क्षण आहे. मुंबई किंवा अन्य ठिकाणी बरीच साधने उपलब्ध असतात, मात्र भंडारा जिल्ह्यातील युवकांनी अल्प साधन सामुग्रीसह खुप सुंदर प्रयत्न देशभरातील चित्रपट क्षेत्रातील विविध भागातील लोकांना एकत्र करत केलेला आहे आणि 'हौसला और रास्ते' हा लघुपट साकारला, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अॅकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.
साखरकर सभागृह, भंडारा याठिकाणी सदर चित्रपट गुरुवारला प्रदर्शित झाला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, रामलाल चौधरी, मुकुंद साखरकर तसेच मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. या चित्रपटाचे निर्माता चेतन भैरम व दिग्दर्शक रोशन भोंडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील युवकांनी केलेला प्रयत्न यशस्वी झाला असा भाव सर्वांच्या ठायी यावेळी दिसून आला. चित्रपटातील सर्व कलाकारांचा सत्कार देखील याप्रसंगी आयोजित केला होता. चित्रपटातील सर्व कलाकार याप्रसंगी उपस्थित होते.
यापूर्वी हा लघुचित्रपट फ्रांस येथील मेडिटेरियन कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणि सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दाखवला गेला. या दोन्ही महोत्सवात 'हौसला और रास्ते' या चित्रपटाला 'बेस्ट फर्स्टटाइम फिल्ममेकर्स' आणि 'स्पेशल फेस्टिवल मेंशन' म्हणून गौरव करण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या या ज्वलंत विषयावर हा लघुचित्रपट तयार केलेला आहे. या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी तथा संगीत दिग्दर्शन प्रशांत चव्हाण (मुंबई) यांनी केले आहे.
अक्षित रोहडा (गुजरात) यांनी सहाय्यक सिनेमेटोग्राफर म्हणून काम केले आहे. प्रशांत वाघाये सहनिमार्ता आहेत, तर योगेश भोंडेकर कार्यकारी निमार्ता आहेत आणि इंस्ट्रक्टर इमरान शेख आहेत. गुजरातचे अभिनेते मौलिक चव्हाण, हिमांशी कावळे प्रमुख भुमीकेत आहेत. तसेच संजय वनवे, अतुल भांडारकर, अंजली भांडारकर, सुरेश जोशी, सरोजलता बर्वे, स्वप्नील जांगळे, नीलेश हंबरडे यांच्या भूमिका देखील या चित्रपटात आहेत.