१६३ पैकी १६१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले मोबाईल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:07+5:302021-09-14T04:42:07+5:30
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे व सर्व पर्यवेक्षिका हजर होते. आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे ...
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे व सर्व पर्यवेक्षिका हजर होते. आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा अध्यक्ष सविता लुटे, ललिता खंडाईत, कमल कमाने, देवागंना शेंडे, मिरा चकोले, मनोरमा हलमारे, उज्वला रामटेके, मोहनी लांजेवार, पुष्पा तितिरमारे, शालिनी तीवतुमसरे, मंदा गोमासे, अर्चना खरवाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून मोबाईल परत करण्यात आले.
शासनाने दिलेले सर्व जुने मोबाईल परत घेऊन नवीन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे, मोबाईलमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, केंद्र सरकारने जुना काॅमन ॲप्लिकेशन ॲप्स (कॅश) बंद करून नवीन पोषण ट्रॅकर ॲप्स दिलेला असून तो सदोष आहे. सर्व माहिती इंग्रजी भरावी लागत आहे. महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्स मराठीत करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने सेविका सहभागी होत्या.
130921\img-20210913-wa0063.jpg
photo