जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, १९८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:39 PM2021-03-23T23:39:49+5:302021-03-23T23:40:54+5:30

भंडारा जिल्हा कोरोनामुक्तच्या वाटेवर असताना अचानक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ व्हायला लागली. मंगळवारी २,२२९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा ६९, मोहाडी १९, तुमसर २६, पवनी ४९, लाखनी १६, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात तीन असे १९८ रुग्ण आढळून आले आहेत.

Outbreak of corona in the district, 198 positive | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, १९८ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, १९८ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे११४३ ॲक्टिव्ह रुग्ण : ६५ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, यावर्षीचे सर्वाधिक रुग्ण मंगळवारी आढळून आले. जिल्ह्यात १९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यात एकट्या भंडारा शहरातील ५९ तर पवनी येथील ४९ रुग्णांचा समावेश आहे. ६५ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११४३ आहे. 
भंडारा जिल्हा कोरोनामुक्तच्या वाटेवर असताना अचानक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ व्हायला लागली. मंगळवारी २,२२९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा ६९, मोहाडी १९, तुमसर २६, पवनी ४९, लाखनी १६, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात तीन असे १९८ रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ४०२ झाली असून, त्यापैकी १३ हजार ९२८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी कुणाचाही कोरोनाने मृत्य झाला नाही. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३३१ व्यक्तींचे बळी गेले आहे.
जिल्ह्यात ११४३ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा तालुक्यात ५१६, पवनी २१६, तुमसर १४४, लाखनी १०७, साकोली ७२, मोहाडी ६५ आणि लाखांदूर तालुक्यात २३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

सर्वाधिक रुग्ण       भंडारा तालुक्यात 
 कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आहेत. जिल्ह्यात आढळलेल्या १५ हजार ४०२ रुग्णांपैकी सहा हजार ५७६ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. तर मोहाडी ११६७, तुमसर १९७३, पवनी १५४४, लाखनी १६४७, साकोली १८१३, लाखांदूर ८६८ रुग्णांचा समावेश आहे.

 

Web Title: Outbreak of corona in the district, 198 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.